नाती जोडवी तर अशी

वैशु हेमंत
Friday, 28 June 2019

नातं कोणतंही असुदे नाती जोडायला कधीही घाई करू नका. एखाद्याला समजुन घ्यायला वेळ द्या. कारण माणूस उलगडत गेल्याशिवाय त्याचा स्वभाव कळत नसतो, म्हणून काही काही जणांना समजायला वेळ जातो तर काही नाती...

नातं कोणतंही असुदे नाती जोडायला कधीही घाई करू नका. एखाद्याला समजुन घ्यायला वेळ द्या. कारण माणूस उलगडत गेल्याशिवाय त्याचा स्वभाव कळत नसतो, म्हणून काही काही जणांना समजायला वेळ जातो तर काही नाती.

सहज जीवाभावाची बनुन जातात. कधी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनुन जातात कळतही नाही. तर कधी काही प्रयत्न करूनही आपल्या मनात रूजत नाहीत. अशी अधांतरीच लटकत रहातात. तर अशी ही नाती फार गुंतागुतीचा आणि तेवढाच महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. खुप हळूवारपणे ही जपावी लागतात. 

समजा एखादं जीवाभावाच नातं तुटलं कारण काहीही असुदे तर होणार्या यातना मरणप्राय असतात म्हणून कधीही कोणाचा विश्वास तोडू नका नाहीतर तुम्ही एका सुंदर मनाच्या व्यक्तीला, एका सुंदर नात्याला कायमचे गमावुन बसाल! मग पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काहीच रहाणार नाही. कारण एखदा मनातुन उतरलेले व्यक्ती पुन्हा मनात कधीच भरत नाही! 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News