गुण पडताळणीत चूकली की शिक्षकांचे मानधनच रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला.
  • त्यानंतर बुधवारपासून गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज प्रक्रियेस सुरवात झाली आहे.

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी (ता. २८) बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर बुधवारपासून गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज प्रक्रियेस सुरवात झाली आहे. 

गुणपडताळणी प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे दहापेक्षा जास्त गुण वाढलेले आढळून आल्यास; ज्या शिक्षकाने उत्तरपत्रिका तपासली त्या शिक्षकाचे मानधन रद्द केले जाणार आहे; तसेच संबंधित संस्थेकडून त्या शिक्षकावर कार्यवाही करण्याचे आदेश बोर्डातर्फे दिले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर २९ मेपासून गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या आवारात गर्दी केली आहे. गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावरील मार्कशीटच्या स्वसाक्षांकित प्रतीसह २९ मे ते ७ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे; तर छायाप्रतीसाठी १७ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल असे विद्यार्थी मंडळाकडे अर्ज सादर करण्यासाठी गर्दी करीत आहेत. 

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी केलेल्या अर्जानंतर पुनर्मूल्यांकनामध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कात आठ ते दहापेक्षा जास्त गुणांनी वाढ झाली; तर ज्या शिक्षकांनी ते पेपर तपासले आहेत, अशा शिक्षकांचे बोर्डातर्फे पेपर तपासणीसाठी दिलेले मानधन रद्द करण्यात येणार आहे; तसेच ज्या शिक्षणसंस्थेत संबंधित शिक्षक रुजू आहेत त्या संस्थेला त्या शिक्षकावर कार्यवाही करण्याचे आदेश बोर्डातर्फे दिले जाणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News