भाजप मध्ये येताय तर नो कमिटमेंट : दानवे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • भाजपने लोकसभा निवडणूक मोदींच्या नावावर आणि कामावर जिंकली आहे
  • देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ ​

मुंबई - भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागत आहे. मात्र, कोणालाही कोणत्याही बाबतीत कसलीही कमिटमेंट दिली जाणार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत पक्षाच्या कार्यालयात मांडले. 

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्रिपदी नियुक्‍ती झाल्यानंतर दानवे यांचा प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला, त्या वेळी दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार भाजपचे सरकार कोणताही भेदभाव न करता पारदर्शीपणे जनतेची सेवा करेल.

केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर दानवे यांचे मंगळवारी प्रथमच भाजपच्या प्रदेश कार्यालयात आगमन झाले.  भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व त्यांचा सत्कार केला. नवनिर्वाचित खासदार गोपाळ शेट्टी यांचा या वेळी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दानवे म्हणाले की, भाजपने लोकसभा निवडणूक मोदींच्या नावावर आणि कामावर जिंकली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा विश्वास ठेवला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News