पक्षाने जबाबदारी दिली तर प्रदेशाध्यक्षपदही स्वीकारू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने राज्य प्रदेशाध्यक्षपदही रिक्त आहे

कोल्हापूर -  ‘मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता  आहे. आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली.  पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर  त्याची जबाबदारी स्वीकारू,’ असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले. ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपमधील संघटनात्मक पदांची निवड लवकरच होणार आहे. याची सुरवात राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यातून होईल. रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने राज्य प्रदेशाध्यक्षपदही रिक्त झाले आहे.

मुख्यमंत्री, ठाकरे निर्णय घेतील
कागलमध्ये विधानसभेचा उमेदवार कोण असेल, याबाबतही विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘कागल विधानसभा निवडणूक दोन्ही घाटगेंपैकी एक जण लढविणार आहे. कोणते घाटगे निवडणूक लढतील, याचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News