पाकिस्तानच्या मनात आलं तर, सेमीफाइनल भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातच होणार

सुरज पाटील (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्याने अख्ख्या वर्ल्ड कपचं रुप पालाटले आहे. या सामन्यामुळे इंग्लंडची सेमीफाइनलसाठी एंट्री धोक्याची ठरली आहे, तर त्या जागेला पाकिस्तानची एन्ट्री होऊ शकते, असा अंदाज क्रिकेटच्या विश्लेषकांकडून वर्तवण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्याने अख्ख्या वर्ल्ड कपचं रुप पालाटले आहे. या सामन्यामुळे इंग्लंडची सेमीफाइनलसाठी एंट्री धोक्याची ठरली आहे, तर त्या जागेला पाकिस्तानची एन्ट्री होऊ शकते, असा अंदाज क्रिकेटच्या विश्लेषकांकडून वर्तवण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे, तर पाकिस्तानने पूढील दोन सामने जिंकले तर पाकिस्तानचा संघदेखील उपांत्य फेरीत पोहोचेल, त्याचबरोबर भारतीय संघसुध्दा आपल्या गुणांच्या आणि खेळीच्या आधारे उपांत्य फेरीत जाणार याची खात्री भारतीय संघ प्रशिक्षकांनी वर्तवली आहे, त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा सेमीफाइनलसाठी टक्कर देऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सेमीफायनलमध्य असा पोहचू सकतो पाकिस्तान...
सध्याच्या घडीला पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघाचे पहिल्या फेरीत असलेले प्रत्येकी दोन-दोन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. इंग्लंडसमोर भारत आणि न्यूझीलंड अशा दोन तगड्या संघाचे आव्हान आहे, तर पाकिस्तानसमोर अफगाणिस्थान आणि बांगलादेश अशा दोन संघाचे आव्हान आहे, मात्र जितकी मेहनत इंग्लंडला घेणे गरजेचे आहे, तितके तगडे आव्हान पाकिस्तानसनोर नाही, त्यामुळे पाकिस्तान संघ सेमीफाइनलमध्ये जाण्याच्या संधी सर्वोत्तम असल्याचे वृत्त वर्तवले जात आहे.

असा जाईल भारत संघ फाइनलमध्ये...
भारतीय संघाने अजूनपर्यंत एकही सामना न हारता, विराट सेना 5 सामन्यांमध्ये 9 गुणांनी तीसऱ्या स्थानकावर आहे, तर इथूनपूढे विराट सेनेला 30 जून रोजी इंग्लंडसोबत तर त्यानंतर वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंकासोबत सामना खेळायचा आहे. भारतासारख्या तगड्या संघाला या संघांचे आव्हान काहीच नसल्याने भारत सहजरित्या या संघासोबत जिंकू शकेल असा अंदार क्रिडा विश्लेषकांनी वर्तवला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News