तरुण कार्यकर्त्याची स्वागत हारात 'घुसखोरी' पहा शरद पवारांनी काय केलं?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 October 2019

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील किमान एक कार्यकर्ता तरी चेहरा आणि नावानिशी माहिती आहे असं सांगितलं जात.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील किमान एक कार्यकर्ता तरी चेहरा आणि नावानिशी माहिती आहे असं सांगितलं जात. मात्र, अकोला येथे बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्या प्रचार कार्यक्रमात काहीसं वेगळंच पाहायला मिळालं. त्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.<

>

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना हार घालत असताना एक कार्यकर्ता अचानक पवारांच्या उजव्या हाताखालून त्या गुलाबाच्या हारात डोकं घालत होता. मात्र, पवारांनी त्याला तात्काळ आपल्या हाताच्या कोपरानं बाजूला केलं. यानंतर या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील कार्यकर्ता कोण हे समजू शकलेलं नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News