नेटकऱ्यांचा ICC वर संताप; #DhoniKeepTheGlove ट्विटरवर ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोजवरून पेटलेल्या वादाचे पडसाद सोशल मीडियावर देखील दिसत आहेत.  #DhoniKeepTheGlove अशा हॅशटॅगने नेटकऱ्यांनी देखील धोनीला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयनेही धोनीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय़ घेतला आहे. धोनीच्या समर्थनार्थ नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतो आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने विजयी सलामी दिली. या मॅचमध्ये धोनीच्या ग्लोजची चांगलीच चर्चा रंगली. परंतु हा ग्लोज धोनीने घालू नये असे आदेश आयसीसीने धोनीला दिले. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला.

धोनीनं ग्लोव्जवर लावलेल्या मानचिन्हात काहीही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. धोनीनं पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे मानचिन्ह असेलेले ग्लोज वापरल्याने टीका होत होती. रितेश देशमुखसह बॉलिवुडमधील अनेक कलावंतांनी धोनीची बाजू घेतली आहे. नेटकऱ्यांनी आयसीसीला चांगलेच धारेवर धरलं आहे. तसेच ट्रोल देखील केले आहे. धोनीने पुढील मॅचमध्ये देखील तेच ग्लोज घालावेत असे नेटकऱ्यांनी म्हटंल आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News