बाळुसोबत लग्न कर, नाहीतर जिवे मारु; सततच्या त्रासाला कंटाळुन युवतीची आत्महत्या

वैजिनाथ जाधव
Tuesday, 25 June 2019
  • गेवराई तालुक्यातील प्रकार
  • बाप लेकावर गेवराई पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद

गेवराई: तालुक्यातील जेमानाईक तांडा राजप्रिंपी येथील एका युवतील गावातीलच बाप लेक मिळुन तु बाळु सोबत लग्न करत नसता, तुला जिवे मारु अश्या धमक्या नेहमीच देत होते. या रोजच्या त्रासास कंठाळुन येतील एका युवतीने आत्महत्या केली. मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलिस स्टेशन मध्ये सोमवारी (ता.२४) दोन जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. 

तालुक्यातील जेमानाईक तांडा राजप्रिंपी येथील मयत ज्योती लहु राठोड (वय १५) या अल्पवयीन मुलीस बाळु सोपान राठोड (मुलगा) व सोपान प्रभु राठोड (बाप) हे बाप लेक सारखाच त्रास देत होते. रोजचा त्रासास कंठाळुन ज्योतीने शनिवारी (ता.२२) गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योतीची आई अनिता लहु जाधव यांच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलिस स्टेशन मध्ये सोमवारी बाळु राठोड व सोपान राठोड यांच्यावर २४१,२०१९ कलम ३०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News