मी सांगली मी कोल्हापूर; मोहीम यवतमाळकरांची

 माधुरी गायकवाड
Thursday, 29 August 2019
  • कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील गावामध्ये विविध स्वरूपातील नुकसान झाले.
  • त्यामुळे त्यांना आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक अशा विविध स्वरूपातील हाणीला सांगली कोल्हापूर कराना सामोरे जावे लागले.

यवतमाळ - आयुष्यात कधी कधी अस वाटत की, जेव्हा नसलेले घेतयं की असलेले देतयं,  हा प्रश्न पडतो?   नैसर्गिक आपत्ती ही तर येतच असते पण ही नैसर्गिक आपत्ती इतकी विक्राळ रूप धारण करेल हे कुनीच सांगू शकत नाही. हे विक्राळ रूप आम्हांला महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले.

जेथे तीन पावन नद्यांच्या संगम होतो (कृष्णा, वारणा, पंचगंगा) अशा ठिकाणी नैसर्गिक संतुलन बिघडून महापुराची परिस्थिती निर्माण झाली. त्याच प्रमाणे मानवानी केलेली कृत्य देखील जबाबदार आहे. हेच परिस्थिती आज कोल्हापूर सांगली या जिल्ह्याना भोगावे लागले. 

कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील गावामध्ये विविध स्वरूपातील नुकसान झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक अशा विविध स्वरूपातील हाणीला सांगली कोल्हापूर कराना सामोरे जावे लागले. लोकांचा जीव वाचवण्या करिता (NDRF) च्या टीमने मदत केली.

काही संस्थानी देखील मदतीचा हात सांगली कोल्हापूर कराना दिला तेथील लोकांना मानसिक आधार तथा थेतील समस्या काही प्रमाणात सोडविण्यासाठी करीता टीम राहत यांनी काही दिवसांपासून नियोजन करून देखील लोकांना आधार देण्याकरिता यावतमाळकरांनी विविध कार्य पार पाडली.

सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथील 130 चमू ची "टीम राहत कोल्हापूर सांगली" या ठिकाणी पोहचली असता त्यावेळी मला चांगले काम करण्याची पहिल्यादा संधी मिळाली त्यानुसार मी होईल त्याप्रमानात कार्य करण्यात सुरुवात केली टीम राहत मधील विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या करून त्यांना ज्याठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे.

अशा ठिकाणी नियोजनाप्रमाने पाठवण्यात आले त्याचप्रमाणे सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातील माजी व  आजी विद्यार्थ्यांनी विविध स्वरूपातील मदत कार्य केले जसे की लोकांना संवादाच्या माध्यमातून मानसीक आधार देणे, स्वछता करणे (शाळा, ग्रामपंचायत, घरे, शासकीय इमारती)गंमत शाळा घेणे.

(लहान मुलांच्या चेहरयावरील हास्य परतण्यासाठी)  पथनाट्य (स्वच्छता, आरोग्य) जागर गीते (आधार देणे) आरोग्य शिबीर घेणे.गावामध्ये जाऊन मुलाखतीच्या माध्यमातून सर्वेक्षण करणे. फॅमिली किट तयार करणे. प्रत्येक गोष्ट ही ठोकर लागल्यावर तुटते परंतु अनुभव ही एक अशी बाब आहे जी खुप वेळा पुस्तक वाचल्याशिवाय देखील मिळते.

 मी अनुभवलेला कोल्हापूर सांगलीतील अविस्मरणीय क्षण, महापूर आलेल्या भागात काम करण्याची संधी त्यामध्ये कोल्हापूर सांगली याजिल्ह्यातील काही गावामध्ये म्हणजे हरिपूर, कावठेपिराण, सावरवाडी, सिद्धार्थ नगर इत्यादी भागात विविध गोष्टी शिकायला मिळाल्या जसे, पूरग्रस्त कुटुंबातील सदस्यांशी प्रत्यक्षात संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेणे.

 पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यामुळे त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला प्रशासन संकटाच्या वेळी कशाप्रकारे काम करत? या बाबी कळल्या, रेड झोन एरिया संबंधित माहिती मिळाली. सर्वेक्षनाच्या माध्यमातून तेथील लोकांची आपुलकी भावना जाणवली.

योग्य त्या वेळी स्वतःतील असलेल्या कौशल्याचा उपयोग करण्याची संधी मिळाली. गंमत शाळा घेताना येथील मूल अतिशय ऍक्टिव्ह असल्याचे आढळले. कोल्हापूर सांगली या ठिकाणी पुस्तका व्यतिरिक्त मानवी व्यथा तथा असलेल्या समस्या सोडविण्याचे सामर्थ्य शिकायला मिळाले.

वरील सर्व आढाव्यावरून मला सांगावं वाटते की सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा प्रत्यक्षात जाऊन काम करण्यात एक वेगळाच आनंद व अनुभव मिळतो. नदीच पाणी जेव्हा पात्रातून बाहेर पडून स्वतःच्या घराच्या उंबरठ्यावर येत तेव्हा कळतं की नेमकं महापूर म्हणजे काय असतं? जेव्हा स्वतःचे घर सोडून दुसरीकडे बाहेर स्थलांतरित व्हायची वेळ येते तेंव्हा कळतं की पूरग्रस्त म्हणजे नेमकं काय असतं?

पुरात अडकलेल्या आपल्याला जेव्हा एखादी रिसर्च टीम वाचवते तेव्हा कळतं NDRF म्हणजे काय असत? एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा आपल्याला एखाद्याची वाट पाहावी लागते तेव्हा कळतं की अन्नछत्र फाउंडेशन म्हणजे नेमकं काय असतं? सोडून पळतो जेव्हा सार काही पण लढण्याची जिद्द असते तेव्हा कळत की नेमकं समाजकार्य म्हणजे नेमकं काय करायचे असते.

घरात बसून सोशल मीडियावर पुराचे अपडेट सगळेच टाकतात पण ज्यावेळी स्वतःजाऊन तिथं मदत कार्य प्रत्यक्षात उभारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कळत की माणुसकीचा धर्म म्हणजे काय असतं वरील माध्यमातून कार्य करण्याची प्रेरणा तथा शिकवण मला सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय तसेच तेथील प्राध्यापकांच्या सानिध्यात  राहून झाली असेच मार्गदर्शन पुढे सुद्धा मिळत राहावे  ही आपुलकी मला या आलेल्या संधी मधून मिळाली.
 

        
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News