मी क्रिकेट मॅच पाहिली की भारत हारणार

सोनाली गायकवाड
Tuesday, 2 July 2019

एक वर्षानुवर्ष जोपासलेली अंधश्रद्धा म्हणजे मी क्रिकेट मॅच पाहिली की भारत हरणार. आता माझ्या बघण्याचा न बघण्याचा खेळाडूंच्या खेळण्याशी काही एक संबंध नाही हे न कळण्याइतके मी नासमज नक्कीच नाही. पण तरीही हा समज मी मनाशी बाळगून आहे.

अंधश्रद्धा कुठल्याही असतात. मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देवीला नवस करणाऱ्यांना अंधश्रद्धाळू म्हणून घोषित करणारे पण वेगवेगळ्या प्रकारची अंधश्रद्धा घेऊन बाळगत असतात. 

अशी एक वर्षानुवर्ष जोपासलेली अंधश्रद्धा म्हणजे मी क्रिकेट मॅच पाहिली की भारत हरणार. आता माझ्या बघण्याचा न बघण्याचा खेळाडूंच्या खेळण्याशी काही एक संबंध नाही हे न कळण्याइतके मी नासमज नक्कीच नाही. पण तरीही हा समज मी मनाशी बाळगून आहे. आणि कोणी कितीही समजावलं तरी मी काही लाईव्ह क्रिकेट मॅच बघत नाही.

कारण मला भारत जिंकायला हवा असतो. मला खात्री आहे अशा प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा घेऊन शेकडो भारतीय, क्रिकेट मॅच बघतात किंवा बघत नाही. मग त्यात अमुक एक माणूस जागेवरुन उठला की विरोधी टीमची विकेट पडणार, तमुक एक व्यक्ती आली की सिक्स मारणार म्हणून लोक त्या माणसाला दहा विकेट पडाव्या म्हणून मॅच दरम्यान शंभर वेळा उठून जायला लावतात किंवा एखाद्याला एकदाही टीव्ही समोर येऊ देत नाहीत.

असे करणाऱ्या किंवा न करणाऱ्या देशप्रेमी अंधश्रद्धाळू लोकांचा त्याग(मॅच न बघण्याचा), मेहनत आणि चिकाटी त्या खेळणार्या अकरा खेळाडूं पेक्षा किंचितही कमी नसते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News