तुझी खंबीरपणाची साथ आज आठवतेय

विशाल शेंडे
Sunday, 4 August 2019

खूप संकटे आलेत जीवनात माझ्या
खंबीरपणाने साथ मला द्यायचास

खूप संकटे आलेत जीवनात माझ्या
खंबीरपणाने साथ मला द्यायचास
कुठलाही स्वार्थ न ठेवता मनात
नेहमी आधार मला द्यायचास

आज खूप दूर आहेस माझ्या
आठवणीत मात्र तू आजही आहेस
तुझे ते प्रेम आपुलकी जिव्हाळा
हृदयात आजही माझ्या तसेच जपून आहे

मैत्री तुझी आणि माझी
सदैव अशीच अतूट असावी
तुझे प्रेम ,स्नेह, जिव्हाळा,आपुलकी
अशीच नेहमी माझ्या सोबत असावी...!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News