मी प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी : शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, अभिनेत्री
Monday, 24 June 2019

शरीर फिट ठेवायचे असल्यास तुम्हाला तेवढी मेहनत करणे गरजेचे असते. त्या मेहनतीत सातत्य असणेही तितकेच महत्त्वाचे असते.
-शिल्पा शेट्टी, अभिनेत्री

प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. ते वेळेत कमी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. घरात लहान मूल असले, की त्याच्याजवळ सतत उपलब्ध असणे गरजेचे असते. पण अशावेळी माझ्या शरीराकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हते. त्यामुळे मी मुलगा झोपला, की दुपारी व्यायाम करायची. सुरवातीला चालणे, सायकलिंग असे प्रकार चालू केले. या माझ्या जिद्दीमुळे मी प्रेग्नन्सीनंतर केवळ १० महिन्यांतच २० किलो वजन कमी केले. 

शरीर फिट ठेवायचे असल्यास तुम्हाला तेवढी मेहनत करणे गरजेचे असते. त्या मेहनतीत सातत्य असणेही तितकेच महत्त्वाचे असते. योग्य मार्गदर्शन, योग्य आहार आणि योग्य मेहनत तुम्हाला निरोगी शरीर मिळवून देऊ शकते. प्रेग्नन्सीनंतर मी जे वजन करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. माझ्या आयुष्यात योगासनांना खूप महत्त्व आहे. मनाला शांत ठेवण्यासाठी मी ध्यानधारणेला महत्त्व देते. 

तुम्ही व्यायाम करत असता तेव्हा तंदुरुस्त आहार घेणेही गरजेचे असते. यासाठी मी बॅलेन्स्ड डाएट घेते. यामध्ये साधारण ब्राऊन राइस, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन शुगर, ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेल्या भाज्या असा आहार घेते. सकाळी मी आवळा किंवा कोरफडीचा ज्यूस घेते. त्यासोबतच ब्राऊन शुगरयुक्त चहा घेते. दुपारच्या जेवणात ब्राऊन राइस, चपाती, डाळ, चिकन, भाज्या घेते. संध्याकाळच्या नाश्‍त्याला एक ब्राऊन ब्रेड टोस्ट, अंडी आणि ग्रीन टी घेते. रात्रीच्या जेवणात सलाड, सूप आणि चिकन घेते. रात्रीचे जेवण नेहमी आठ वाजता घेते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News