मला विश्‍वचषकात खेळायचे होते ; डिव्हिलर्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने पहिले तीनही सामने गमावले. त्यानंतर या संघात एबी डिव्हिलर्स हवा होता, अशी चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे डिव्हिलर्स निवृत्तीचा विचार मागे घेऊन विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी तयार होता.

कर्णधार, प्रशिक्षक, निवड समिती प्रमुख या सगळ्यांना भेटून त्याने आपली इच्छा बोलून दाखवली होती. पण, संघ व्यवस्थापनाने त्याची विनंती फेटाळून लावली. अर्थात, या मागे त्यांनी सांगितलेली दोन कारणेही महत्त्वाची होती.

एक म्हणजे मे २०१८ मध्ये निवृत्ती घेतल्यामुळे त्याने संघनिवडीसाठी आवश्‍यक असलेले निकष पूर्ण केले नव्हते. म्हणजे तो वर्षभरात ना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला ना त्याने देशांतर्गत स्पर्धेत सहभाग घेतला. दुसरे कारण म्हणजे ३५ वर्षीय डिव्हिलर्सच्या अनुभवाला प्राधान्य दिले गेले, तर वर्षभर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर अन्याय झाला असता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News