मला या खेळाडुच्या बायोपिकमध्ये काम कराचयं : दिपीका

सकाळ (यिनबझ)
Friday, 28 June 2019

एका मुलाखतीमध्ये दिपीका पाडुकोनला खेळासंदर्भातील प्रश्न विचारला गेला. कोणत्या खेळाडूवर बायोपिक काढावा असा प्रश्न विचारल्यास दीपिकाने वेळ वाया न घालवता यांच नाव घेतल...

मुबंई : सध्या बॉलिवुडमध्ये सगळीकडेच बायोपिकचा ट्रेंड चालु आहे. 83 या बायोपिकमध्ये दिपीका महत्वाची भुमिका साकारताना दिसणार आहे. नुकतच एका मुलाखतीमध्ये दिपीका पाडुकोनला खेळासंदर्भातील प्रश्न विचारला गेला. कोणत्या खेळाडूवर बायोपिक काढावा असा प्रश्न विचारल्यास दीपिकाने वेळ वायान घालवता वडील प्रकाश पादुकोण यांच्यावर बायोपिक काढण्यात यावा असे सांगितले. इतकंच नाहीतर तिने या चित्रपटात काम करण्याची इच्छासुद्धा व्यक्त केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Deepika Padukone (@

 

deepikapadukone) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

to the kindest,purest,most gentle soul I’ve ever known....Happy Birthday Pappa!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

भारतीय क्रिकेट संघाच्या १९८३ विश्वचषक विजयावर आधारित '८३' या चित्रपटात दीपिका महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंह हा या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत असून दीपिका कपिल यांची पत्नी रोमी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय दीपिका सध्या अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत असून दीपिकासह या चित्रपटात विक्रांत मेसी देखील झळकणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News