रुमालने बांधलेल्या मुलीला शुक-शुक करून आवाज दिला अन् ती..!

डॉ.राहुल दासु इंगळे
Thursday, 8 August 2019
  • स्त्रीला फक्त लैंगिक दृष्टिनेच समाजात बघितलं जातं याला काही विद्वान स्त्री च्या कमी कपड्यांना दोष देतील त्यांना माहीत असावं की 2 वर्षाच्या चिमुरडीवर देखील बलात्कार होतात, त्या चिमूरडीला तर कपडे म्हणजे काय ते पण माहीत नसत तसच बुरखा घातलेल्या स्त्रीला पण पालटून बघतात तरी दोष कपड्यांनाच...

दोन महिन्याआधी मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो, माझ्या दहावीत असलेली भाचीची उद्या सहल जात असल्यामुळे भाचीची तयारी चालू होती, भाची ने सहलीला जाण्यासाठी जिन्स टॉप असे कपडे बॅग मध्ये भरले होते, माझी बहीण तिने भरलेले एक एक कपडे बघत होती आणि जिन्स टॉप असल्यामुळे एक एक कपडे कॅन्सल करत होती, माझ्या भाचीचं उलटं चालू होत भाची माझ्या जवळ आली आणि 'तू मम्मी ला सांग ना...' अशी म्हटली. मी ताईला बोललो, ताई उलट माझ्यावरच चिडली. मी त्या माय-लेकींना सोडून खूप रात्र झाली म्हणून झोपयला गेलो, रात्री 2 वाजता मला जाग आली आणि त्या रात्री मी एक कथा लिहली...

कथे मध्ये इकबाल नावाचा एक व्यक्ती होता, इकबाल याचा कपड्याचा व्यवसाय होता, त्याच वय 50 वर्षाच्या जवळपास होत, त्याच्या बायकोच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे तो तिला सोडायला सासरी गेला होता, थोडावेळ तिथ थांबला आणि त्याचं कपड्याचं दुकान उघडण्यासाठी तिथून परत आला, येतांना तो हमीद चाचा यांच्या दुकानात गेला, तसा तो हमीद चाचा कडे कधी जात नसतो. 

जात असताना त्याला एक कॉलेजला जाणारी रुमालाने चेहरा बांधलेली मुलगी तिची खाली पडलेली ओढणी उचलत असताना दिसली, ती खाली वाकल्यामुळे इकबाल ला तिच आंतर शरीर दिसल, तो तिच्या शरीराला एक टक नजरेने बघत होता त्याला त्या मुली बद्दल वेगळ्याच भावना निर्माण झाल्या, थोड्यावेळाने ती मुलगी तिची लाल बॅग घेऊन तिथून थोड लांब असलेल्या कॉलेज मध्ये गेली.

इकबाल देखील हमीद चाचा कडे न जाता त्याच्या दुकानाकडे त्या मुली बद्दल विचार करत निघाला. इकबाल हा सहसा घरी जात नसायचा तो दुकानांतच रहायचा, या रात्री त्याला स्वप्नात पण ती रुमालने चेहरा बांधलेली मुलगी दिसली त्याने तिच्याबद्दल खूप विचार केला, तिचं अंग त्याच्या डोळ्यासमोरुन जातच नव्हतं. 

दुसऱ्यादिवशी तो हमीदचाचा यांच्या जवळ परत गेला, तो त्या मुलीला परत बघण्यासाठी तिथ आला होता, हमीदचाचा यांना सहसा टाळणारा इकबाल आता रोज हमीद चाचाना भेटायला जाऊ लागला, थोड्यावेळाने ती रुमालने चेहरा बांधलेली, लाल रंगाची बॅग असलेली मुलगी त्या रस्त्याने जावु लागली, तो आता त्या मुलीला रोज तिच्या नकळत बघु लागला, त्या मुलीचा चेहरा नेहमी रुमालने बांधलेला असायचा, इकबालला ती मुलगी खुपच जास्त भावली होती, तिच्या शरीरा बद्दल तो सतत विचार करत असे. तो रोज त्या रुमालने चेहरा बांधलेल्या मुलीला त्याच्यासोबत स्वप्नात शय्येवर बघत असे त्या रात्री त्याने तिला सकाळी भेटण्याचा निर्णय पक्का केला. सकाळी त्याने त्याचं कपड्याच दुकान उघडल आणि थोडयावेळाने तो हमीद चाचा च्या दुकानकडे गेला. 
 
आज तो पहिल्यांदा त्या रुमालने चेहरा बांधलेल्या मुलीसोबत बोलणार होता, तो ती येण्याची वाट बघत असतानाच तेवढयात ती मुलगी त्या रस्त्याने जायला लागली. इकबाल च्या चेहऱ्यावर तिला बघून खुप आनंद झाला, त्याने तिला थोडे पुढ जावु दिलं आणि नंतर तो तिच्या पाठीमागे गेला, त्याने त्या चेहरा रुमालने बांधलेल्या मुलीला शुक-शुक करून आवाज दिला ती मुलगी मागे पलटली ती पलटल्या बरोबर ती इकबाल ला बघून ‘अब्बु’(बाबा) म्हटली, त्याच लक्ष तिच्या उराकडेच होत . 

ती अब्बु म्हटल्याबरोबर याने एकदम तिच्या डोळ्यात बघितलं, आज पहिल्यांदा त्याने तिच्या डोळ्याकडे बघितलं होत, तिने चेहऱ्यावरचा रुमाल काढला तर ती त्याची मुलगीच होती. तो अब्बु हे शब्द ऐकुन हादरला, त्याचा चेहरामरणसुन्न झाला, त्याच्या डोळ्यातून आग निघत होती, त्याच शरीर गरम झाल, तो तिच्या जवळून धावत सुटला, पुढे जावून त्याने दोन-तीन उलट्या केल्या, त्याच शरीर पुर्ण घामाने भिझल होत, तो जोराजोरात धावू लागला आणि दिसेनासा झाला .

रात्री खुप वेळाने तो घरी गेला त्याची मुलगी जागीच होती, आई घरी नसल्यामुळे ती एकटीच होती. इकबाल घरात आल्यावर त्याची मुलगी त्याच्यासाठी जेवण आणयला गेली, तो तिला जेवणासाठी नाही म्हटला म्हणून तिने फ्रीज मधून सफरचंद काढून आणलं आणि चाकू ने कापायाला लागली, इकबाल ला टेबल वर ती लाल बॅग दिसली त्याचा चेहरा अजून विचारात पडला त्याला स्वतःवर खंत वाटली, तिने त्याला सकाळी धावत का गेले म्हणुन विचारलं.

इकबाल जोऱात रडायला लागला ती लगेच त्याच्याजवळ गेली त्याने तिला सांगितलं, की 'मी एका चेहरा रुमालने बांधलेल्या मुलीवर किती दिवसांपासून नजर ठेवून होतो, मी त्या मुलीच्या शरीराच्या नशेत होतो, मी दिवसरात्र तिचाच विचार करत होतो मला तिच शरीर खुप आवडल होत... पण जेव्हा कळलं की ती चेहरा रुमालने बांधलेली मुलगी तुच आहे तर मी...'

तो इतक सांगताच त्याच्या मुलीचे डोळे लाल झाले, तिच्या चेहऱ्यावर चे भाव एकदम अक्राळ होते आणि ती जोरजोरात श्वास घेत क्षणाचा विलंब न करता हातात असलेल्या चाकूने तिने इकबाल चा गळा कापला... आणि जोरात ओरडत म्हणाली की ‘ती तुमची मुलगी नसली तरी कोणाची तरी मुलगी होतीना’. इकबाल गळ्याला हात लावत चेहऱ्यावर स्मितहास्य करत ‘मै बाप बनणे के लायक नही था... असं म्हणुन मरून गेला . 

स्त्रीला फक्त लैंगिक दृष्टिनेच समाजात बघितलं जातं याला काही विद्वान स्त्रीच्या कमी कपड्यांना दोष देतील त्यांना माहीत असावं की 2 वर्षाच्या चिमुरडीवर देखील बलात्कार होतात, त्या चिमूरडीला तर कपडे म्हणजे काय ते पण माहीत नसत तसच बुरखा घातलेल्या स्त्रीला पण पालटून बघतात तरी दोष कपड्यांनाच...

माझा सेक्स या भावनेला विरोध नाही पण तो होण्यासाठी एकमेकांची परवाणगी देखील गरजेची असते. कपड्याने कोणी वेगळं ठरत नसत प्रत्येक माणसानं स्त्रीला फक्त स्त्री म्हणूनच न बघता माणुस म्हणुन बघाव

माझी भाची आणि ताई सकाळी 5 वाजताच उठली होती, मी ताईला आवाज दिला आणि म्हटलं की दुसऱ्याच्या वाईट नजरेमुळे तिची इच्छा नष्ट करू नको... ही तिची इच्छा काही दिवसच असणार नंतर तुम्ही तीचं लग्न लावून तिला अजून बंदिस्त करणार आहे त्या मुळे तिला आता जे आवडते ते करू दे...

भाचीला सहलीच्या गाडीजवळ सोडायला मी माझी कार घेऊन गेलो, ती कार च्या खिडकी जवळच बसली होती माझ्या भाची ने जिन्स पॅंट आणि टॉप घातला होता, तिने खिडकीतून चेहरा बाहेर काढला आणि मस्त हसली, तिचे केस वाऱ्याने मस्त उडत होते...
आणि कार मध्ये गाणं चालू होत...
 आज कल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते मेरे, 
 बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए...

मैं बाप बनने के लायक नही था अस इकबाल ने का म्हंटल ? ह्याचा प्रत्येकाने आपल्या परीने विचार करावा... ही कथा प्रत्येक वाचणाऱ्याच्या स्वाधीन...

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News