वाटले नव्हते भेट घडेल...

सुनिल पवार
Wednesday, 26 June 2019

वाटले नव्हते 
भेट कधी घडेल..
आभाळाचे धरणीवर
प्रेम कधी जडेल..!!

वाटले नव्हते
वारा सहयोग देईल..
मेघांचा गोतावळा जमवून
प्रेमाचा वर्षाव करील..!!

वाटले नव्हते
ती नवतीचा शालू नसेल..
आभाळाचे स्वागत
ती गंधाळून करेल..!!

वाटले नव्हते
स्वप्नांचे इंद्रधनू फुलेल..
दोहोंच्या प्रेमात
आपलंही प्रेम फुलेल..!!
 

वाटले नव्हते 
भेट कधी घडेल..
आभाळाचे धरणीवर
प्रेम कधी जडेल..!!

वाटले नव्हते
वारा सहयोग देईल..
मेघांचा गोतावळा जमवून
प्रेमाचा वर्षाव करील..!!

वाटले नव्हते
ती नवतीचा शालू नसेल..
आभाळाचे स्वागत
ती गंधाळून करेल..!!

वाटले नव्हते
स्वप्नांचे इंद्रधनू फुलेल..
दोहोंच्या प्रेमात
आपलंही प्रेम फुलेल..!!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News