मी देखील अनेक रात्री रडत घालवल्या..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019
  • संघर्षाचा काळ सहन केला
  • "मी देखील अनेक रात्री रडत घालवल्या आहेत"
  • मी या सिनेसृष्टीत नवी होते
  • विद्या बालन हे हिंदी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्री

'मिशन मंगल' या चित्रपटात काम करणाऱ्या आणि एकेकाळी आयुष्यात खूप  वाईट दिवस पाहिलेल्या आभिनेत्री विद्या बालन यांनी सिनेसृष्टीत आल्यानंतर  संघर्षाचा काळ सहन केला त्यानंतर "मीदेखील अनेक रात्री रडत घालवल्या आहेत" असं त्या पूढे जाऊन  म्हणाल्या कारण मी या सिनेसृष्टीत नवी होते, अनेकदा मला नवीन काम, नवीन भूमिका मिळेल असं वाटायचं आणि ती भूमिका मिळायची नाही आणि आज विद्या बालन हे हिंदी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्री आहे.  तरी आपल्या सिनेसृष्टीतल्या आणि मालिका विश्वातल्या प्रवासाबाबत तिने तिची काही मते व्यक्त केली.

सुरूवातीची तीन वर्ष हा कालावधी माझ्यासाठी खडतर प्रवास होता अशी ती म्हणाली त्यावेळी मी रडायचे, झोपायचे आणि या आशेवर उठायचे की, दिवसाची आजची माझी सुरूवात चांगली जाईल आज काहीतरी चांगले होईल त्यानंतर मला परिणिता सिनेमा मिळाला आणि माझ्या आयुष्याचे पानच उलटले.

मिशन मंगल मधली विद्या बालन (तारा) नावाच्या महिलेची जी भूमिका आहे ती अशी आहे की, फार काही माझ्यापेक्षा ती वेगळी नसुन दोघी समान गोष्टी आहेत. जेव्हा मी संकटांना न  डगमगता सामोरी जाते तसेच गुण समानतेत तारामध्येही आहे असे पूढे जाउन विद्याने म्हटले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News