मी एक युवक आहे...

स्वप्निल नंदकुमार करळे,सातारा
Saturday, 26 January 2019

मी एक युवक आहे आणि आपण अशा एका उभारणाऱ्या देशाचं भविष्य आहे, याची जाणीव होते तेव्हा जबाबदारी, कर्तव्ये लक्षात येऊ लागतात. अशी कर्तव्य देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. माझ्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा कुठंतरी देशाच्या विकासाला हात भार लावत असतो. आम्ही एकमेकांना बांधले गेलेलो आहोत, हे आम्हाला समजतच नाही. आम्ही सगळं काही आपलं वयक्तिक असतं असं मानतो; पण आपण आपल्या एका छोट्या छोट्या कृतीने समाजाच्या आणि देशाच्या जडणघडणीत हातभार लावत असतो.

मी एक युवक आहे आणि आपण अशा एका उभारणाऱ्या देशाचं भविष्य आहे, याची जाणीव होते तेव्हा जबाबदारी, कर्तव्ये लक्षात येऊ लागतात. अशी कर्तव्य देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. माझ्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा कुठंतरी देशाच्या विकासाला हात भार लावत असतो. आम्ही एकमेकांना बांधले गेलेलो आहोत, हे आम्हाला समजतच नाही. आम्ही सगळं काही आपलं वयक्तिक असतं असं मानतो; पण आपण आपल्या एका छोट्या छोट्या कृतीने समाजाच्या आणि देशाच्या जडणघडणीत हातभार लावत असतो.

यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जी युवकांपुढील आव्हाने सांगितली, तिचा आम्ही विचार करायला पाहिजे. त्याआधी कर्तव्ये समजण्यासाठी आम्ही कसे आहोत? कुठे आहोत? हे प्रश्न स्वतःला करू, तेव्हा उत्तरे नक्की मिळतील. मला दोन प्रकारचे तरुण दिसतात. आम्ही सारे एकाच तर समाजाचे भाग असतो आणि याच विविधतेने नटलेल्या समाजात विविध जगण्याच्या पद्धती स्वीकारलेल्या पिढ्या आहेत. काही तरुण सामाजिक दृष्ट्या दुर्बल असतात कारण त्यांना उभारण्यासाठी वाव मिळालेला नसतो आणि काही तरुण-तरुणी एका वाटेवर फसलेल्या असतात. मला या विषयी थोडं सांगायचं आहे.

असंख्य ध्येय ठेवून आम्ही देशाच्या प्रगतीचा विचार करीत जेव्हा उद्याच्या भारताची स्वप्ने बघत असतो तेव्हा उगवणाऱ्या सूर्यापासून प्रेरणा घेत असतो मात्र मावळतीच्या सूर्याला ही स्वप्ने थांबवू शकत नाही. काहीतरी तशी गत आपली होऊन बसलीये.शिक्षणाचा अभाव असणारी पिढी आणि शिक्षणाचा विपर्यास केलेली पिढी एकाच समाजाच्या दोन बाजू. एखादं नेतृत्व तयार व्हायला असंख्य कष्ट घ्यावे लागतात. मग ते नेतृत्व सामाजिक, राजकीय असो नाहीतर कुठल्या तरी कले मधील. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेला महाराष्ट्र आणि त्यांनी निर्माण केलेली युवा नेतृत्वाची फळी आज ही भारताच्या विशेष राजकीय पटलावर कार्य करते आहे.

आज प्रत्येक चौकात युवा नेतृत्वाचा,नेत्यांचा झगमगाट झालाय. कुणी पंडित नेहरूंना 'आमचं काळीज' म्हणलं नसेल, नाहीतर कोणत्या भपकेबाज ओळींच्या स्तुतींनी त्यांनी त्यांचं नेतृत्व पुढं आणलं असेल. आमच्या आजच्या चौका चौकात दिसतेय ती अशा ध्येयशून्य विचारांची स्वघोषित युवा नेतृत्वाची फळी. मग वाढदिवस आणि मिरवणुका काढून कुठला समाज प्रगती करणार? आम्ही आमची आव्हाने ओळखून पुढे चालायचं की अशाच अडगळीत जाऊन पडायचं. समांतर विकासाची ध्येय घेऊन पुढे येणारी पिढी एक बाजूला आणि गळ्यात कित्येक तोळे सोने घालून समाजाच्या विकासासाठी नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेली पिढी एक बाजूला. देशाच्या प्रगतीसाठी भारताचा कार्यकर्ता होऊन जिथं गरज असेल तिथं जाऊन कार्य करण्यासाठी प्रेरित होणारी पिढी आमच्या देशाचं भविष्य. 

कुठल्या तरी राजकीय नेत्यांचा कार्यकर्ता हा अडगळीला पडलेला असतो. आम्हाला कार्यकर्त्यांची फळी घडवणारे नेते ही तितकेच मिळाले आणि कायकर्त्यांना त्यांच्याच जागेवर ठेवणारे ही तितकेच. नव्या पदव्या, नवी स्टाईल ही आज राजकारणात शिरू पाहत असलेली समस्या. जिथं वैचारिक बैठक नाही, देशाचा इतिहास, भूगोल माहिती नसणारी, समाज कारण जाणून न घेता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारी पिढी कुठं तरी आम्हाला ऱ्हासाकडे घेऊन जाईल.बदलेला गावगाडा आणि बदलत जाणारं शहर हेही आव्हान आज आमच्या समोर आहे.
आम्ही संस्कृती च्या गप्पा न मारता त्यातील संस्कार घेऊन पुढे चालावं तर पाश्चिमात्य परंपरा यांनी आमच्या देशात केलेला शिरकाव हे ही भयानक आहे. रस्त्या रस्त्यावर आज युवक निर्भत्सपणे वागताना दिसतात. सौन्दर्याची व्याख्या बदलून ती झगमटाणे इतक्या सहजरित्या घेतलीये की आता यातून आम्ही कसे सोडवू स्वतःला? हे प्रश्न अनुत्तरित नसावेत. आमचा इतिहास आमची जीवनशैली ही कित्येक हजार वर्षाची देणं असताना आम्हाला बाहेरचं जास्त अप्रूप वाटावं. या साठी आमची शिक्षण व्यवस्था ही तितकी प्रगल्भतेच्या वाटेवर उभी हविये. आमच्या देशात सर्जनशील तरुणांची खाण असताना, आम्ही कुठल्याच पातळीवर कमी नसताना काही कीड लागलेली विचार सरणी ही लागलीच बाहेर काढली तर नवा भारत, येणाऱ्या भारताची प्रतिमा ही महापुरुषांच्या कार्याला साजेशी ठरेल.

प्रत्येक तरुणांची देशाच्या विविध प्रकारच्या प्रगतीमध्ये गरज आहे. तरुण हा देशाचा कणा आहे आणि जशी आव्हाने आहेत तशा अनेक संधी आमच्या दाराशी उभ्या असलेल्या दिसून येतात. बदलत जाणारी माध्यमं आमच्या प्रगतीच्या वाटेवर अडथळा ठरावी? इतके आम्ही वाहवत जाणार नाही हा आमचा सुरू असलेल्या नवं वर्षाचा संकल्प असेलच. यावरून कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेल्या ओळी आठवता, 
"तरूणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरूवरी,
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळू नका"

अनेक आव्हाने जेव्हा असतात तेव्हा कुठंतरी लढायला शक्ती येते. नव्या भारताच्या स्वप्नासाठी आम्ही प्रत्येक युवक कंबर कसून तयार राहू, ही शपथ घेऊन आव्हाने कितीही आली तरी आमच्या देशाचा झेंडा हा डौलात फडकत ठेवू.
जय हिंद.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News