हार, पुष्प टाळून गरिबांना मदत हाच माझा सत्कार: कामगार मंत्री डॉ. संजय कुटे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019
  • राज्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे.
  • त्यामुळे शेतकरी अडचणी तर आहेच शिवाय शेतीवर अवलंबून असणारा मजूर वर्ग, गोरगरीब जनताही यामुळे त्रस्त झाली आहे.
  • गोरगरीब जनता, कार्यकर्ते आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळे मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे हार, पुष्पगुच्छ आणि इतर गोष्टींवर खर्च करुन आनंद व्यक्त केल्यापेक्षा जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करा हाच माझा खरा सत्कार 

बुलढाणा: राज्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अडचणी तर आहेच शिवाय शेतीवर अवलंबून असणारा मजूर वर्ग, गोरगरीब जनताही यामुळे त्रस्त झाली आहे. या गोरगरीब जनता, कार्यकर्ते आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळे मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे हार, पुष्पगुच्छ आणि इतर गोष्टींवर खर्च करुन आनंद व्यक्त केल्यापेक्षा जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करा हाच माझा खरा सत्कार असल्याचे भाविक आवाहन कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले आहे. 

कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर डॉ. संजय कुटे यांचे पहिल्यांदा जिल्ह्यात आगमन होत आहे. जिल्ह्यासह जळगाव जामोद मतदार संघात कमालीचे उत्साहवर्धक वातावरण असून, सर्वांना त्यांच्या आगमनाची ओढ लागली आहे. राजकीय इतिहासात जळगाव जामोद मतदारसंघाला पहिल्यांदाच कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण, नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग या खात्यांच्या कॅबिनेट मंत्री पदाचा बहुमान डॉ. संजय कुटे यांच्या माध्यमातून मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी हार, पुष्पगुच्छ आदींना महत्त्व न देता केलेल्या आवाहनमध्ये मला मंत्री पद मिळावे ही मतदार संघासह, जिल्ह्याभरातील नागरिक, कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांची जनभावना होती. आणि त्यामुळे नवचैतन्य सगळ्यांमध्ये निर्माण झाले आहे.

प्रत्येकाला माझा सत्कार करावा असे वाटत असून, याबाबत त्यांच्या मनामध्ये मोठा उत्साह आहे. त्यांची ही भावना मी समजू शकतो, परंतु, या नव उत्साहातून हार, पुष्पगुच्छ, फटाके, मिठाई, ढोल आदींवर होणारा खर्च शेवटी अनाठायीच ठरणार आहे. मी सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेला एक कार्यकर्ता असून, मला समाजातील गोरगरीब, होतकरू घटकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे अशा प्रसंगाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील गोरगरीब गरजूंना मदत केल्यास मला मनस्वी आनंद होईल आणि तोच माझा खरा सत्कार ठरणार असे भावनिक आवाहन त्यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News