"इन सुरों में शब्द भर दो!" सुष्मा स्वराज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019

नवी दिल्ली - नवी दिल्लीयेथील धडाडीच्या राजकीय नेत्या, वक्ता दशसहस्त्रेषु असे वर्णन केल्या जाणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. 

डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास आकस्मित व लोकमत दुःखद निधन झाले.

अडीच वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याने स्वराज यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या; मात्र त्यानंतरही त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री पदाची सूत्रे धडाडीने हलविली होती.

नवी दिल्ली - नवी दिल्लीयेथील धडाडीच्या राजकीय नेत्या, वक्ता दशसहस्त्रेषु असे वर्णन केल्या जाणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. 

डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास आकस्मित व लोकमत दुःखद निधन झाले.

अडीच वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याने स्वराज यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या; मात्र त्यानंतरही त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री पदाची सूत्रे धडाडीने हलविली होती.

दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, सर्वात कमी म्हणजे केवळ 25 व्या वर्षी वयात हरियाणासारख्या राज्याच्या मंत्रिपदी विराजमान झालेल्या राजकीय नेत्या, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी या दोन्ही भाजपसरकार यांच्या काळात मंत्रिपदी भूषवणाऱ्या त्या माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना काल संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रात्री दहाच्या सुमाराला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वराज यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती.

किडनी निकामी झाल्यामुळे स्वराज यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने निवासस्थानही सोडले. काल रात्री स्वराज यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल  केल्यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी एम्सकडे धाव घेऊन स्वराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

राजकीय दृष्ट्या त्यांनी अतिशय तल्लख प्रतिक्रिया नोंदवणे सुरू ठेवले होते. जम्मू आणि काश्मीर चे 370 वे कलम रद्द करण्याचे विधेयक नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दोन दिवसात राज्यसभेत मंजूर केल्यावर स्वराज यांनी तातडीने ट्विट करत सरकारचे विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. त्यांचे ते शब्द होते की, 'हा क्षण पाहण्यासाठीच मी जिवंत आहे...” त्यांचे हे शब्द जणू विधात्यानेच खरे केले आणि लोकसभेत जम्मू-काश्मीर मंजूर झाल्यावर काही तासातच स्वराज यांनी इहलोकाचा निरोप घेतला.

स्वराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गडकरी आदी नेत्यांची रीघ एम्सकडे लागली.

प्रभू श्रीकृष्णाच्या अतिशय निस्सीम भक्त असलेल्या स्वराज यांची कारकीर्द वादळी राहिली. हरियाणाच्या मंत्री, दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि मोदी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री अशा स्वराज यांनी जेथे जातील तेथे आपल्या कामाची छाप सोडली. 

विशेषतः 2014 मध्ये परराष्ट्र मंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर स्वराज यांनी एकतेसाठी जी कामगिरी केली, तसेच राष्ट्रसंघात पाकिस्तानचा बुरखा टरका होणारी जी भाषणे केली, त्यामुळे त्यांचे परराष्ट्र व्यवहार मंत्रीपद संस्मरणीय ठरले. देशात अडकलेल्या हजारो नागरिकांना स्वराज यांनी एका ट्विटर संदेशावर तातडीने कारवाई करत मुक्त केले हिचं ची कामगिरी भारतीय इतिहासात कायमस्वरूपी स्मरणात राहणारी ठरणार आहे.

स्वराज यांनी सक्रिय निवडणूक राजकारणातून निवृत्ती पत्करली तरी राजकारणातून निवृत्ती पत्करलेली नाही असे सकाळच्या प्रतिनिधीला नुकतेच सांगितले होते. विदेश मंत्रालय तर्फे दरवर्षी जानेवारीत होणाऱ्या विशेष भात वेळात वेळ काढून त्यांनी सकाळची बातचीत केली होती, त्या वेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की मी लढवणार नाही असे म्हटले आहे आणि ते माझ्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे आहे मात्र राजकारण संन्यास घेतलेला नाही.

दरम्यान स्वराज यांच्या प्रकृतीबाबत एम्स रुग्णालयातर्फे आज मध्यरात्रीच्या सुमारास  निवेदन जारी केले जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान काँग्रेसने त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच आपली आदरांजली व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि स्वराज यांच्यात अनेकदा राजकीय मतभेद होऊनही मधील संबंध अतिशय जिव्हाळ्याचे राहिले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांनीही संदेश दिले आहेत.

इन सुरों में शब्द भर दो! 
स्वराज यांनी सकाळला तीनदा मुलाखती दिल्या. आपल्या आयुष्यातली पहिली कविता खास सकाळच्या दिवाळी अंकासाठी लिहिली. त्या कवितेचे शब्द होते, इंस रोमेश शब्द भरदो भाव का मकरंद भरदो एक दिव्यानंद भरदो...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News