५० मीटर उंचींच्या धबधब्याचा बाज घुमतोय सगळीकडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • सध्या पाऊसही  दमदार पडत असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला हा धबधबा आता फेसाळून खळखळू लागला आहे. पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी पर्यटकही आता गर्दी करीत आहेत.

डिचोली - पावसाळी पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला हरवळे धबधबा सध्या फेसाळून वाहत असून हा धबधबा स्थानिक तसेच देशी - विदेशी पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. रविवार आणि अन्य सुटीच्या दिवशी तर या धबधब्यावर तरुणाईसह पर्यटकांची गर्दी उसळत असून ते या धबधब्यावर मनसोक्‍तपणे पर्यटनाचा आनंद लुटताना आढळून येत आहेत.

एका बाजूने निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या धबधब्यावर मिळणारी पावसाळी पर्यटनाची मजा काही औरच असली तरी सुरक्षेच्यादृष्टीने विशेष उपाययोजना नसल्याने हा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी तेवढाच असुरक्षितही असल्याचे यापूर्वीच्या काही घटनांवरून स्पष्ट होत आहे. 

जागतिक नकाशावर झळकलेला डिचोली तालुक्‍यातील हरवळेतील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. जगभरात या धबधब्याची किर्ती पसरलेली आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात स्थानिक तसेच देशी-विदेशी पर्यटकांना हा धबधबा आकर्षित करीत असतो. साखळी शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर श्री रुद्रेश्वर मंदिर परिसरात हा धबधबा आहे. साधारण ५० मीटर उंचावरून पावसाळ्यात कोसळणाऱ्या या धबधब्याचे शीतल सौंदर्य न्याहाळण्यासाठी तसेच पावसाळी पर्यटनाचा आस्वाद लुटण्यासाठी दरवर्षी या धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळत असते.

सध्या पाऊसही  दमदार पडत असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला हा धबधबा आता फेसाळून खळखळू लागला आहे. पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी पर्यटकही आता गर्दी करीत आहेत. हरवळेतील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिध्द असल्याने सध्या पर्यटनाचा आस्वाद लुटण्यासाठी रोज पर्यटकांच्या गाड्यांची रिघ लागते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News