माणुसकी संपत चालली...

श्रीनिवास गेडाम
Tuesday, 9 July 2019

कामचुकारपणा, बेशिस्त, भ्रष्टाचार बेजबाबदारपणा आमच्या अंगाअंगात खोलवर मुरलेला आहे. आमचं देशप्रेम इंडीया पाकिस्तानविरूध्द जिंकतो तेव्हाच उतू जातं. एरवी नाही. तारूण्य औटघटकेचं आहे,

नुकतीच एक बातमी वाचली. मुंबईच्या वरसोवा भागात राहणारी अंशी वर्षाची एक वृद्ध व्यक्ती वारली. ही व्यक्ती एकटीच राहत होती. जवळचं असं कुणीच नातेवाईक नव्हतं. एक नात होती. ती कुठेतरी दूर राहत होती.

देखभाल करायला कुणीच नव्हतं. पाच वर्षापुर्वी म्हातारी वारली होती तेव्हा पासून ते एकटेच होते. ते मेले तेव्हा कुणीच जवळ नव्हतं.सातआठ दिवसांनी दुर्गंधी यायला लागल्यावर ते मेल्याचं कळलं. इतरवेळी नसली तरी आयुष्याच्या संध्याकाळी पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची खूप भावनिक गरज भासते.

एखाद्याला मुलंमुली असली तरी  ते आपल्याच विश्वात रममाण असतात. कारण त्यांचा ऐन उमेदीचा काळ असतो. खरी साथ पतीपत्नीचीच असते. परंतु दोघांपैकी कुणाला तरी आधी जावं लागतं. जो मागे राहतो त्याची खूप फटफजिती आणि केवीलवाणी स्थिती होते. आपल्या देशात जेष्ठ नागरीकांची फार वाईट स्थिती आणि त्यांच्या विषयी अनास्था आहे. ना समाजाला जेष्ठांची फिकीर आहे ना सरकारला! 

जेष्ठांसाठी बनवलेले कायदेकानून नुसते कागदोपत्री असतात. त्याची प्रभावी अमलबजावणी होत नाही. एखाद्या वृद्ध आजारी आहे. त्याला पैशाची गरज आहे पण तो बँकेत जाऊ शकत नाही अशा स्थितीत बँक अधिका-याने घरी जाऊन पैसे दिले पाहिजे असा नियम आहे. पण नोकरशाही मुजोर असल्याने कायद्याची अमलबजावणी होत नाही.

जेष्ठांच्या संघटना आहेत पण त्या सरकारवर प्रभाव पाडू शकत नाही. विदेशात जेष्ठांसाठी खूप चांगले कायदे आहेत. त्यांची अमलबजावणी पण काटेकोर पणाने होते. जे वृद्ध आश्रमात राहत नाही आणि एकटे राहतात त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन मदत केली जाते. त्यांच्या मनोरंजनासाठी आणि एकटंपण दूर करण्यासाठी घरांना भेटी दिल्या जातात. 

पुस्तक वाचून किंवा अन्य मार्गाने मनोरंजन केल्या जातं. आपण याची साधी कल्पनाही करू शकत नाही. आपल्या भारतीय लोकात सेवाभाव नाही. कामचुकारपणा, बेशिस्त, भ्रष्टाचार बेजबाबदारपणा आमच्या अंगाअंगात खोलवर मुरलेला आहे. आमचं देशप्रेम इंडीया पाकिस्तानविरूध्द जिंकतो तेव्हाच उतू जातं. एरवी नाही. तारूण्य औटघटकेचं आहे, आपणही एकदिवस म्हातारे होऊ तेव्हा ही वाईट परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते हे लक्षात घेऊन समाजाने जेष्ठांप्रती आदर नि कृतज्ञता दाखविली पाहिजे असं मला वाटतं.

गावखेड्यात नाही म्हटलं तरी अजूनही थोडीफार माणुसकी शिल्लक आहे. महानगरात कुणी कुणाला विचारत नाही. यंत्रावर काम करून करून माणसंही यंत्रवत झाली आहेत. मुळात त्यांचं काळीजच हरवलं आहे. खूप विचार केला की डोकं एकदम सुन्न होऊन जातं!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News