टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं हुमा कुरैशीला पडलं महागात...

सुरज पाटील
Monday, 1 July 2019

काही दिवसांपूर्वी आपल्या 'लैला' या वेबसीरीजच्या माध्यमातून देशभर चर्चेत असलेली हुमा कुरैशी पुन्हा एकदा एका अलग अंदाजात ट्रोल होताना दिसत आहे.

देशात स्वतंत्रपणे आपलं मत मांडणाऱ्या अनेक महिला आहेत, ज्या देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपलं परखड मत मांडत असतात, त्यापैकीच एक म्हणजे हुमा कुरैशी. काही दिवसांपूर्वी आपल्या 'लैला' या वेबसीरीजच्या माध्यमातून देशभर चर्चेत असलेली हुमा कुरैशी पुन्हा एकदा एका अलग अंदाजात ट्रोल होताना दिसत आहे.

रविवारी 30 जून रोजी झालेल्या भारत विरुध्द इंग्लंड या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी निळ्या ऐवजी भगव्या जर्सीचा वापर केला होता. ही जर्सी फक्त एकाच सामन्यासाठी वापरण्यात येणार होती मात्र, हुमाने आपले ट्वीट करून असे म्हटले आहे की, 'अंधविश्वासाची कोणतीच गोष्ट नाही; मात्र आम्हाला पुन्हा निळी जर्सी हवी आहे... खूप बोलला'

याला उत्तर देताना अनेक लोकांनी हुमाला ट्रोल करण्यास सुरूवाते केली आहे. भगवा हा रंग तिरंगामध्येही आहे. मग भारतीय संघातील खेळाडूंच्या जर्सीवर हा रंग असला तर काय चुकीचं आहे? याच्या व्यतीरिक काही लोकांचं म्हणनं असं आहे की ही जर्सी फक्त एका दिवसासाठी आहे, हुमाला ही गोष्ट बोलण्याची कोणतीच गरज नव्हती. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News