बॉक्स ऑफिसचे गणितं बदलणारा 'हम आपके है कौन' झाला २५ वर्षाचा! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019

५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन चित्रपट रिलीज झाला होता. आज या सिनेमाच्या रिलीजला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. 'हम आपके है कौन'मुळे  बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची गणितं बदलली. विशेष म्हणजे या चित्रपटातला २५ वर्ष होऊनही आजही उत्सुकता आणि जादू कायम आहे.

५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन चित्रपट रिलीज झाला होता. आज या सिनेमाच्या रिलीजला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. 'हम आपके है कौन'मुळे  बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची गणितं बदलली. विशेष म्हणजे या चित्रपटातला २५ वर्ष होऊनही आजही उत्सुकता आणि जादू कायम आहे.

भारतातील लग्नांची गणितं बदलली

सूरज भरजातीया दिग्दर्शित 'हम आपके है कौन' चित्रपटामुळे फक्त बॉक्स ऑफिसवरची गणितं नाही बदलली तर भारतात होणाऱ्या लग्नांची गणितं सुद्धा बदलली. चित्रपटात दाखवल्या प्रमाणे लग्नातील विविध समारंभ तर आज एक फॅशन होऊन बसले आहेत. मग ते मेहेंदी असो किंवा एंगेजमेन्ट हे सगळं या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे फॉलो केलं जातय. 'जुते दो पैसे लो...' या गाण्याने आणलेली बूट चोरायची पद्धत तर प्रत्येक लग्नाची एक परंपरा झाली आहे.

अनेक रेकॉर्ड नावावर  

१९९४ साली तब्बल ४ कोटी २० लाखांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास २ बिलियनचा बिझिनेस त्या काळी केला. १ बिलियनच्या क्लबमध्ये जाणार हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. हम आपके है कौन चित्रपटात एकूण १४ गाणे होते, हा सुद्धा नवा रेकॉर्ड केला होता. त्यावेळी भारतात तब्बल ७ करोड ४० लाख तिकीटे विकल होती. 'हम आपके है कौन' सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाला आणि नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

पुरस्कारांचा पाऊस 

सगळ्या अवॉर्डस् वर  'हम आपके है कौन' या चित्रपटातने आपलं नाव कोरलं. १३ फिल्मफेअर नॉमिनेशन्सपैकी ५ अवॉर्डस्, ६ स्क्रिन अवॉर्डस्, तर 'बेस्ट फिल्म प्रोव्हायडिंग होलसम एन्टरटेमेंट' हा राष्ट्रीय पुरस्कार देखील सिनेमाला मिळाला. भारतीय चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या 'हम आपके है कौन' चित्रपटाची पंचविशी झाली तरी चित्रपटातची क्रेझ मनात कायम राहील हे निश्चित.<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News