'वॉर' मधील हृतिक-टायगरचा ॲक्‍शन थरार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

 हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा ‘वॉर’ चित्रपट म्हणजे ॲक्‍शनचा बोलबालाच. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हृतिक-टायगरच्या ॲक्‍शन सीन्सची झलक पाहायला मिळाली.

मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा ‘वॉर’ चित्रपट म्हणजे ॲक्‍शनचा बोलबालाच. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हृतिक-टायगरच्या ॲक्‍शन सीन्सची झलक पाहायला मिळाली. आता या दोघांचा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो समोर आला आहे.

हृतिक-टायगर एका भल्या मोठ्या काचेला आदळून बाहेरच्या दिशेने उडी मारताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतात, ‘हा ॲक्‍शन सीन चित्रित करत असताना आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली होती आणि यामध्ये हृतिक-टायगरने चित्रपटासाठी घेतलेली मेहनत कामी आली.’ खरं तर या चित्रपटामधील ॲक्‍शन सीन्सच चित्रपटाचं मुख्य आकर्षण असणार आहेत. हिंदीसह तमीळ, तेलुगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News