हृतिक-सुजैन एकत्र? सुजैनचा हृतिकसाठी इंस्टाग्रामवर मेसेज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुजैन गेल्या चार-पाच वर्षांपासून वेगळे राहत आहेत. दोघांमध्ये कमालीचा अबोला आहे. परंतु दोघेही आपल्या मुलांसाठी वेळ निश्‍चितच देतात. आता हृतिकचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.

हा चित्रपट बिहारमधील ब्रिलियंट शिक्षक आनंद कुमार यांच्या जीवनावर बेतलेला आहे. सुजैननेदेखील नुकताच हा चित्रपट पाहिला आणि तिनेही हृतिकच्या कामाची स्तुती केली आहे.

इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट करताना म्हटले आहे, की ‘हृतिक, तुझ्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीतील बेस्ट परफॉर्मन्स या चित्रपटात आहे. मला तुझ्या कामाबद्दल नक्कीच अभिमान वाटतो.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News