सरकारी वकील कसे बनाल ?

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 16 November 2019

सगळे अनुभवी सरकारी वकील असा सल्ला देतात की सरकारी वकील बनायचे असेल तर परीक्षा देणे योग्य ठरेल. 
 

 वकील बनण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्रायव्हेट वकिलीचा अनुभव असणे गरजेचे असते. सरकारी वकिलीसाठी तुमच्याकडे जितके जास्त ग्राहक तुम्ही जोडू शकाल तितका जास्त अनुभव तुम्हाला मिळतो. मात्र वकिलीसाठी काही अटी आहेत त्या मध्ये तुमची योग्यता झाली तर तुम्ही सरकारी वकील बनण्यास योग्य आहात. प्रथम महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे भारताचे नागरिकत्व असणे गरजेचे. विकिलीसाठीचे वय ३५ वर्ष असायला हवे. तसेच कमीत कमी ७ वर्षाच्या वकिलीचा अनुभव तुम्हाला  असणे गरजेचे असते . 

सरकारी वकीलाची निवड ही सरकार कडून होत असते. हे सगळ्यात वकिलांसाठी चुकीचा मुद्दा ठरतो कारण दर पाच वर्षांनी सरकार बदलत असते आणि सरकार हे आपल्या मर्जीनुसार सरकारी वकिलांची निवड करतात. त्यामुळे जो सरकारी वकील असेल त्याला स्वतःला माहित असणे कठीण असते की मी किती काळासाठी सरकारी वकील म्हणून पदावर कार्यरत असेन. मात्र वकिलीच्या परीक्षेनंतर सरकारी वकीलाँच कार्यकाल हा कायम स्वरूपाचा असतो. म्हणून सगळे अनुभवी सरकारी वकील असा सल्ला देतात की सरकारी वकील बनायचे असेल तर परीक्षा देणे योग्य ठरेल. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News