आमदारांची नाराजी कशी दूर करावी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमाेर आव्हान

सकाळ (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • मंत्रिपदावरून शिवसेनेत धुसफूस, जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांच्या नावाला विराेध
  • शिवसेना विधानसभेतील आमदार नाराज 

मुंबई : मंत्रीपदाची नेमणूक  झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी निवडले गेले होते. त्यामुळे लोकांमधून निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाचे आमदार नाराज होते. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच ही नाराजी पुन्हा एकदा दिसुन आली आहे.

आताही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा परिषदेवरील आमदारांचीच नावे संभाव्य मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून समोर येऊ
लागल्यामुळे विधानसभेतील आमदारांची नाराजी कशी दूर करावी, असा प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आहे. 

भाजप सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १० मंत्रिपदे आली होती. त्यात दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत अशा परिषदेवरील नेत्यांनाच कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली होती. आताही संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले बीडचे जयदत्त क्षीरसागर आणि उस्मानाबादचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद आमदार तानाजी सावंत यांचे नाव घेतले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News