'हे' व्हॉट्‌स ॲप फिचर सांगणार की कितीवेळा मॅसेज फॉरवर्ड झालाय

तृषा वायकर (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

जगभरात व्हॉट्‌स ॲपचे कोटींमध्ये फॅन आहेत. व्हॉट्‌स ॲप हा एक सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, पण याच व्हॉट्‌स ॲपचा दुरुपयोग होत आहे. लोक एकमेकांना चुकीचे मॅसेज फॉरवर्ड करतात. यामुळे चुकीची माहिती पसरत असते, हे, थांबवण्यासाठी व्हॉट्‌स ॲपकडून नवीन फिचर लाँच करण्यात आलं आहे.

व्हॉट्‌स ॲपने एक नवीन फिचर अपडेट केले आहे, ते म्हणजे आपण कोणाला मॅसेज फॉरवर्ड केले तर तो मॅसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे हे आता समजणे शक्य झाले आहे.

मॅसेज फॉरवर्ड करण्यासाठी व्हॉट्‌स ॲपने एक लिमीट घातली आहेत. त्या लिमीटच्या वर आपण एखादा मॅसेज फॉरवर्ड करू शकत नाही. जे लोक चुकीची माहिती पसरवतात त्यांच्यावर आता आळा बसणार आहे.

या फिचरमुळे कोणता मॅसेज किती व्हायरल झालाय हे समजणार आहे. चुकीचा मॅसेज कसा लोकांमध्ये व्हायरल होतो, याचं उदाहरण म्हणजे कालच व्हॉट्‌स ॲपचा काही काळ प्रॉब्लेम चालू होता, तर लोकांनी लगेच व्हॉट्‌स ॲपसाठी आता पैसे मोजावे लागणार, असे मॅसेज व्हायरल केले जात होते, या अशाच चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हॉट्‌स ॲपने हे फिचर लवकरच अपडेट करणार असल्याची माहिती आहे.

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News