अशी कशी लेकरं दिली देवानं आम्हाला..?

   ‌साक्षी रामदास साळुंखे
Wednesday, 14 August 2019

स्वप्नातही कधी पाहिलं नव्हतं
की भेटेल असं आयुष्य जगायला,
स्वत:चीच लेकरं कमी पडणार नाहीत , आम्हाला घराबाहेर काढायला..!

स्वप्नातही कधी पाहिलं नव्हतं
की भेटेल असं आयुष्य जगायला,
स्वत:चीच लेकरं कमी पडणार नाहीत , आम्हाला घराबाहेर काढायला..!

लहानपणी यांचे हट्ट सगळे पुरविले,
पण आता मात्र आमच्यासाठी त्यांनी त्यांच्या मनाचे दरवाजे कायमचेच काय बंद केले..!

रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस यांना सांभाळलं,
जग सारं कळायला लागल्यावर मात्र;
त्यांनी दूधातील माशीप्रमाणं आम्हाला काढून फेकलं..!

यासाठीच का केलं आम्ही लहानाचं मोठं त्यांना ?
खूपचं त्रास होतो जेव्हा या सगळ्या आठवणी,
स्पर्श करून जातात आमच्या मनांना..!

आमचंच काय ? अभाग्य आहे अशा कितीतरी आई -वडिलांचं,
ज्यांना सुद्धा सुख नाही मुलांच्या राज्यात,
त्यांच्या स्वत:च्या घरी राहण्याचं..!

येता उतारवयात आम्ही ओझं बनलो यांच्यावर,
कशाला पुरवतात मग, 
पैसा तरी काळजी दाखवायला वरवर..?

चीड येते कधी -कधी ऐकून अशा गोष्टी,
वेळ नाही यांना , आई -वडिलांच्या अंत्यसंस्काराला ,
कदाचित यामुळेच वेळ येते असं बोलायची की,
" अशी कशी लेकरं दिली देवानं आम्हाला..?"

 

          

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News