अधिकारी व्हायचंय? मग हे वाचा.. 

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 31 January 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ या वर्षात घेण्यात येणाऱ्या 'सहायक कक्ष अधिकारी', 'विक्रीकर निरीक्षक', 'पोलिस उपनिरीक्षक' गट ब (अराजपत्रित) स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे स्वरूप जाणून घेणार आहोत. 

     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ या वर्षात घेण्यात येणाऱ्या 'सहायक कक्ष अधिकारी', 'विक्रीकर निरीक्षक', 'पोलिस उपनिरीक्षक' गट ब (अराजपत्रित) स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे स्वरूप जाणून घेणार आहोत. 

    या तिन्ही परीक्षांमध्ये पूर्वपरीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप, प्रश्नांची संख्या, गुण, वेळ या सर्वबाबी सारख्या आहेत. सन २०१७ पासून तिन्ही पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध  होत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी एक, दोन किंवा तिन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छितात का, असा विकल्प देण्यात येईल. उमेदवाराने ज्या पदांसाठी विकल्प दिले असतील. ते त्या संबंधित पदभरतीसाठी अर्ज समजण्यात येतील.

     या संयुक्त पूर्वपरीक्षेचा प्रत्येक पदासाठी वेगळा निकाल घोषित करण्यात येणार आहे. प्रत्येक पदासाठी भरावयाच्या जागांची संख्या वेगळी असल्याने त्या आधारावर त्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या ठरविण्यात येणार आहे. ही संख्या लक्षात घेऊन सामायिक पूर्वपरीक्षेतील पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर त्या-त्यापदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. या मुख्य परीक्षा त्या-त्या पदांसाठी सध्या असलेल्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित असतील. कोणत्याही पदाच्या पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम प्रश्न संख्या, गुण, वेळ अशा इतर बाबींमध्ये कोणताही बदल सध्यातरी करण्यात आलेला नाही. 

भरपूर वाचन आवश्यक 
भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या आणि या परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येचा विचार केल्यास कितीतरी पटीने अधिक अर्ज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त होत असतात. सरासरी एका जागेसाठी हजारो अर्ज केले जात असतात. त्यामुळे साहजिकरीत्या स्पर्धा चुरशीची असते. अधिकारी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असेल तर तो पूर्वपरीक्षा होय. कारण पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे अधिकारी होण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने यशस्वीरीत्या पाऊलपुढे टाकण्यासाठी पूर्वपरीक्षेत चांगली कामगिरी आवश्यक असते. 

पोलिस उपनिरीक्षक
कर्तृत्व, करिअर आणि समाजसेवा या तिन्ही गोष्टी एकत्र साधायच्या असतील, तर खाकी वर्दीला पर्याय नाही. सर्वसामान्य जनतेचं रक्षण करणारा, गुंडाराज-भ्रष्टाचार या विरोधात लढणारा आणि त्याचवेळी स्वत:च्या करिअरचा आलेख उंचावणारा असा पोलिस अधिकारी समाजाला हवा असतो. ‘खलनिग्रहणायसद् रक्षणाय’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची आज समाजव्यवस्थेला नितांत आवश्यकता आहे. या क्षेत्रात स्वत:च्या करिअरसोबत समाजाचं ऋणही फेडता येतं. 
भविष्यातील संधी : पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस निरीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक यांसारख्या पदांवर बढतीच्या संधी उपलब्ध होतात.

विक्रीकर निरीक्षक
विक्रीकर हा राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. व्यापारी, उद्योजक यांच्याकडून विक्रीकराची वसुली, पडताळणी करण्यासाठी विक्रीकर निरीक्षकांची नेमणूक राज्य सरकारतर्फे केली जात असते. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या महानगरांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याने या महानगरांमध्ये विक्रीकर निरीक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात असतात. 

सहायक कक्ष अधिकारी 
मंत्रालय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) हे एक महत्त्वाचे पद असते. शासनाच्याप्राप्त होणाऱ्या विविध प्रस्तावांची नियमानुसार तपासणी करणे, त्यात सुधारणा करून त्याला योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. शासनाच्या विविध प्रस्तावांवर टिपणी व शासनाच्या पत्रांचे मसुदे तयार करून सादर करण्याचे काम कक्ष अधिकाऱ्यांना करावे लागते. विधिमंडळातील प्रश्न व लक्षवेधी सूचना आदींची मसुदा उत्तरे तयार करून सादर करणे, त्याचप्रमाणे शासनाची विविध न्यायालयीन प्रकरणे हाताळणे यांसारखी महत्त्वाची कामे कक्ष अधिकाऱ्यांना करावी लागतात. 
भविष्यातील संधी : सहायक कक्ष अधिकारीपदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनात कक्ष अधिकारी, अवर सचिव व शासनाचे सहसचिव अशा महत्त्वपूर्ण पदांवर बढतीच्या संधी उपलब्ध असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News