आषाढीला विठ्ठलाच्या पूजेवेळी मानाचे वारकरी कसे ठरवले जातात?

निवृत्ती बाबर
Friday, 12 July 2019

आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्त पंढरपूरमध्ये दाखल होतात. आळंदी देहू व इतर ठिकाणाहून आलेल्या पालख्या आषाढीच्या एक ते दोन दिवस अगोदर पंढरपुरात दाखल होतात. वारी आणि आषाढी एकादशी किती महत्वाची असते हे सर्व भाविक जणांना माहित आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून आषाढीचे महत्व सांगीतले आहे.

१९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा केली जाते, तर त्यांच्यासोबत मानाचे वारकरी पुजेस उपस्थित असतात. ते निवडण्याचा अधिकार मंदिर समितीकडे असतो.

यंदाच्या विठ्ठलाच्या पुजेचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हाण आणि प्रयागाबाई चव्हाण या दाम्पत्याला मिळाला.

पूजेसाठी कसे निवडले जातात मानाचे वारकरी?
विठ्ठलाची पुजा ही पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पुजेची तयारी चालू होते. अशा वेळी दर्शनरांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दांपत्याला हा मान दिला जातो. जे दांपत्य दर्शन रांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पुजा करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्या दांपत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News