कोल्हापूरचं हॉटेल कृष्णा डीलक्स आणि चिकन फ्राय थाली

सुरज पाटील (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

अर्धा महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने नाविलाजास्तव मला कोल्हापूरला जायला मिळालं.

अर्धा महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने नाविलाजास्तव मला कोल्हापूरला जायला मिळालं. शहरात कित्येक वेळा मी गेलोय, पण कामापूरतं काम करून घरी फिरलो, पण खरं कोल्हापूर फिरलो ते म्हणजे आज.कोल्हापुरातला बिंदू चौक, राजारामपुरी, राजाराम पुरीतल्या खास 14 गल्ल्या, 24 तास गजबजलेलं बस स्टँड आणि बरच काही. जगाच्या पाठीवर कुठेही जा, कोल्हापूरच्या तांबड्या-पांढऱ्या रस्याच आणि इथल्या सोलकडीचं कौतुक ऐकायला मिळतं. कारण ते जगात भारी आहेच. हे पुणेकरांनादेखील मान्य करावं लागेल.

कोल्हापुरातील सगळ्यात वर्दळ असलेल्या बिंदू चौकातील एकदम फेमस हॉटेल म्हणजे हॉटेल कृष्णा डीलक्स. हे हॉटेल रात्री 8 वाजता सुरू होतं ते रात्री 11.30 पर्यंत चालू असतं. इथलं चिकन मसाला थाळी, मटण मसाला थाळी, चिकन फ्राय, मटण फ्राय थाळी, अंडा करी आणि शाकाहारी थाळी म्हणजे स्वर्गच.हॉटेलमध्ये गेल्यावर पहिला कुपन घ्यावी लागते. चिकन थाली असल्यास निळी आणि मटण असल्यास तांबडी कुपन, त्यात काही नंबर देखील आहेत, जी त्यांच्यासाठी कोडिंग लँग्वेज असते. हॉटेलमध्ये एन्ट्री केली की डाव्या बाजूला दिसतो, तो आपल्या कोहलापूरचा इतिहास सांगणारा वास्तवदर्शी फोटो आणि उजव्या बाजूला शाहू महाराजांना अभिवादन.

हॉटेलमध्ये इतकी गर्दी असते की हॉटेलमध्ये आल्या-आल्या कुपन घ्यावी लागते आणि वेटिंगवर थांबावं लागतं... जागा मिळाली की बसायचं, त्यांचा एक वेटर येईल, तुमच्याकडून कुपन घेईल, समोर पक्वानाचं खमंग ताट आणून देतील, काही वेळ झाला की रस्सा, कांदा, चपाती, राईस असे पदार्थ विचारतील आणि तुम्हाला त्रास न देता किंवा बाकीच्या हॉटेलप्रमाणे कोणतीही आरडाओरड न करता तुम्हाला जेवायला देतील...

आज आम्ही चिकन फ्राय थाळी घेतली होती, निळी कुपन देऊन, त्या चिकन फ्रय प्लेट, चिकन कुरमा, अनलिमिटेड तांबडा आणि पांढरा रस्सा, सोलकडी, दोन चपाती, दम राईस आणि कांदा लिंबू... ताट बघूनच पोट भरलं, बाकी जेवताना काय खाऊ नि काय नको ते झालं होतंच, एकदम जगात भारी आमची कोल्हापूरी थाळी. (यात पुणेकरांनी वाद करू नये)

शेवटी ऐसा क्षण जो मुकला
त्याने नरकवास भोगला...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News