मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे तरुणाईला शिंगे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट विद्यापीठातील संशोधक डेव्हिड शहर आणि मार्क सेयर्स यांच्या संशोधनातून ही बाब समोर आली.

नवी दिल्ली - मोबाईल अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलशिवाय जगणे तरुणाईला जणू अशक्‍य बनले आहे; पण मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरातील हाडांच्या ढाच्यात बदल होतात. मोबाईलमध्ये कायम डोके खुपसल्याने मान आणि कवटीदरम्यान शिंगसदृश हाड विकसित होते, असे एका संशोधनातून उघड झाले आहे.

ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट विद्यापीठातील संशोधक डेव्हिड शहर आणि मार्क सेयर्स यांच्या संशोधनातून ही बाब समोर आली. १८ ते ३० वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये कवटीखाली शिंगासारखे हाड विकसित होते.   मोबाईलच्या अतिवापरामुळे सातत्याने मान खाली राहत असल्याने मांसपेशींमध्ये तणाव निर्माण होऊन, डोक्‍याच्या खालच्या आणि मानेच्या वरच्या भागात शिंगासारखे हाड विकसित होते, असा संशोधकांचा दावा आहे.
मोबाईलच नव्हे; तर मान वाकवून हाताळावी लागणारी लहान स्क्रीन असलेल्या उपकरणांमुळेही शरिरातील हाडांच्या ढाच्यात  बदल होतात. ते अनुवांशिक नसून मानेवर पडलेल्या अतिताणामुळे होतात, असे 

पुरुषांमध्ये अधिक बदल
ऑस्ट्रेलियात झालेल्या या अभ्यासासाठी संशोधकांनी १२०० व्यक्तींची चाचणी केली. त्यापैकी ३३ टक्के लोकांमध्ये हे बदल झाले. बहुतांश व्यक्तींचे वय १८ ते ३० दरम्यान होते. हे बदल महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक होत असल्याचे या जैवअभियांत्रिकी संशोधनातून स्पष्ट झाले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News