भुजबळ आहात तिथेच रहा म्हणत शिवसेनेची बॅनरबाजी

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 26 July 2019

'बाळासाहेबांना दिलेला त्रास विसरू शकत नाही'; भुजबळांविरोधात होर्डिंग्ज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची लवकरच घरवापसी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर काही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या.

रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने मुंबईत तसे होर्डिंग अनेक ठिकाणी लावलेत. अगदी मातोश्री कलानगर, शिवसेना भवन, वरळी सी लिंक, घाटकोपर, विक्रोळी परीसरात हे होर्डिंग लावण्यात आलेत.

केसात गजरा आणि गावभर नजरा अशा काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळते जुळते वाटते! उगवला दिवस की मी परत येतो… साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही आपण आहे तिथेच रहा असा मजकूर लिहून रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने छगन भुजबळ यांचा निषेध नोंदवला आहे. हा मजकूर असलेले हे बॅनर मातोश्रीच्या समोर, शिवसेना भवनाच्या समोर आणि मुंबईतल्या प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.

छगन भुजबळांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश नको. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळांनी जो त्रास दिला ते शिवसैनिक अजूनही विसरलेले नाहीत. अशा मजकूराचे हे होर्डिंग लावण्यात आलेत. त्यामुळे भूजबळ जर शिवसेनेत परत आले तर त्यांना शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News