घरीच करा दातांचा पिवळेपणा साफ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

एक चमचा लिंबाच्या रसात दोन चमचे समुद्री मीठ मिसळून पेस्ट तयार करा. याने ब्रशच्या मदतीने हलक्‍या हाताने दातांवर घासा.

एक चमचा लिंबाच्या रसात दोन चमचे समुद्री मीठ मिसळून पेस्ट तयार करा. याने ब्रशच्या मदतीने हलक्‍या हाताने दातांवर घासा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा प्रयोग केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होतो. यामुळे दातांना नैसर्गिकरीत्या चमक मिळते.

  • -एक चमचा बेकिंग सोड्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट दातांवर लावून ३ ते ४ मिनिटे ठेवा. नंतर पाण्याने गुळण्या करा. बेकिंग सोड्यातील ब्लिचिंग गुण दातांना स्वच्छ करतात.
  • -एक कप पाण्यात दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगार टाकून त्याने गुळण्या केल्याने दात पांढरे दिसतात. यामुळे तोंडातील दुर्गंधीदेखील जाते.
  • -सेंद्रिय खोबरेल तेलामध्ये लोरिक ॲसिड असते. यामुळे दातावरचा पिवळेपणा दूर होऊन दात मजबूत होतात. यासाठी तेलाचे काही थेंब दातावर लावून बोटाने मसाज करा. पाच मिनिटांनी गुळण्या करा.
  • -केळ्यामध्ये पोटॅशियम असते. यामुळे दातांचा पिवळेपणा आणि दुर्गंध दोन्ही दूर होतात. यासाठी केळीचे तुकडे दातावर घासून मसाज करावा. यामुळे दात स्वच्छ व चमकदार होतात. 
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News