इथं अवघ्या 70 रूपयात मिळतं घर, वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019
  • काळाची चक्र फिरली आणि शहराची सुबत्ता गेली
  • अमेरिकेतली वाहननगरी दिवाळखोरीत

 स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मुंबईत म्हाडा आणि नवी मुंबईतल्या लॉटरीवर तर लाखो लोकांच्या उड्या पडतात. पण अमेरिकेत एक असं शहर आहे जिथं अवघ्या 70 रूपयांपासून घरं मिळतायेत. ऐकून आश्चर्य वाटेल...पण हे खरंय. काय आहे या स्वस्त घरांमागचं राज चला पाहूयात.

 आपलं स्वत:चं छानसं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्याकरता अनेकजण आपल्या कमाईतून पै-पै जमवत या स्वप्नासाठी धडपडत असतो. बऱ्याचदा पैशांअभावी इच्छा असूनही आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. पण जरा थांबा...अमेरिकेत चक्क 65 रूपयात घर मिळतंय. होय हे अगदी खरं आहे. अमेरिकेतल्या डेट्रोइट शहरात अशा स्वस्त घरांची लॉटरीची निघालीय. अर्थात ही कोणतीही शासकीय योजना नाही की हा गरिबांसाठी काढलेला मोफत घरांचा प्रकल्पही नाही...खरं तर दिवाळखोरीला कंटाळून इथल्या लोकांनी ही घरं स्वस्तात विक्रीसाठी काढली आहेत. एकेकाळी डेट्रोइट हे शहर वाहननगरी म्हणून ओळखलं जातयं. गाड्यांच्या निर्मितीत हे शहर अग्रेसर होतं. पण काळाची वक्रदृष्टी पडली आणि हळूहळू इथल्या उद्योगांचा ऱ्हास होत गेला. त्यामुळेच इथं असलेली महागामोलाची घरं कवडीमोल दरात विकण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आलीय. 

दिवाळखोरीला वैतागून इथल्या एका रहिवाश्यानं ईबेवर त्याचं घर चक्क 1 डॉलर म्हणजे 70 रुपयांना विकलंय. सेंट क्लेअर एसटी इथं त्यानं 3484 चौरस फुट जागेत 2248 चौ. फुटांचं बांधकाम केलं होतं. याच प्रकारे फ्लेमिंग एसटी येथील ३०४९ चौ, फुट जागेत बांधलेले ८३२ चौ. फुटाचं घरही ७० डॉलर्स म्हणजे ४४५० रुपयात विकले गेलंय. हे घर बांधण्यासाठी मालकानं ३२५५५ डॉलर्स खर्च केले होते. पेन्टोस्की एव्हेन्यू इथलं एक घर काही महिन्यापूर्वी ८४५० रुपयांना विकलं गेलं. तीन बेडरूमचं हे घर ९७४ चौ. फुटांचं होतं. मॅलरिज एसटी या घराला केवळ 4399 रूपये इतका भाव मिळालाय. दोन बेडरूमचं हे घर 650 चौ.फुटांचं आहे. अशाच प्रकारे खुपसारी खरं ही 10 हजार रूपयांच्या आता विकली गेली आहेत.

खरं तर कोणेएकेकाळी या शहरात प्रचंड सुबत्ता होती. हे शहर आर्थिक भरभराटीच्या शिखरावर होतं. पण आता इथल्याच लोकांना पैशांसाठी बेघर होण्याची वेळ आलीय़. काळाची चक्र नेमकी कधी आणि कुणाच्या दिशेनं असतील हे कुणाची सांगू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे डेट्राइट शहर...
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News