आदिवासी तरुणांनी केली नक्षल बॅनरची होळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019
  • ताडगुडा फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते.  
  • ताडगुडा व कसुरवाही येथील आदिवासी तरुणांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली.

गडचिरोली: ताडगुडा व कसुरवाही येथील आदिवासी तरुणांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली.
यावेळी उपस्थित तरुणांनी नक्षलवाद मुर्दाबाद घोषणा दिल्या. नक्षलवाद्यांनी सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला विरोध केला. आदिवासी बांधवावर नक्षलवादी सप्ताहाच्या नावाखाली अत्याचार करत असल्याचे सांगत यापुढे आदिवासी तरुण हे खपवून घेणार नाही असे तरुणांनी स्पष्ट केले.

उपविभाग पेंढरी अंतर्गत जारावंडी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील ताडगुडा फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते.  

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून २८ जुलै ते ३ ऑगस्ट 'आदिवासी विकास सप्ताह' साजरा करण्याचे घोषित केले आहे. यामध्ये तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन, युवकांची खेळ, आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वोतोपरी मदत करणार आहे. 

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या नक्षल सप्ताहाला न जुमानता अनेक आदिवासी तरुणांनी घराबाहेर पडून आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र यावे. गडचिरोली पोलीस दलाने राबवित असलेल्या 'आदिवासी विकास सप्ताहात' मध्ये सामील व्हावे.
- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News