दहावीच्या निकालादिवशी फेमस झालेल्या जानव्हीचा हा आहे इतिहास...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019

कालच एसएससी बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आणि देशभरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा समोर येऊ लागल्या. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या यशामागचे चेहरे, क्लासेसचा फंडा अशा अनेक गोष्टींना विद्यार्थ्यांनी श्रेय दिलं. आज अशाच एका विद्यार्थीनीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जी विद्यार्थीनी आयुष्यात कधी शाळेची पायरी न चढता सर्वोत्तम गुणांनी पास होतेय, नेमकं काय आहे यामागचं कारण, हे आपण जाणून घेऊ...

कालच एसएससी बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आणि देशभरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा समोर येऊ लागल्या. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या यशामागचे चेहरे, क्लासेसचा फंडा अशा अनेक गोष्टींना विद्यार्थ्यांनी श्रेय दिलं. आज अशाच एका विद्यार्थीनीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जी विद्यार्थीनी आयुष्यात कधी शाळेची पायरी न चढता सर्वोत्तम गुणांनी पास होतेय, नेमकं काय आहे यामागचं कारण, हे आपण जाणून घेऊ...

दहावीपर्यंत एकदासुध्दा शाळेची पायरी न चढलेल्या कोल्हापूरच्या जानव्ही ऋतूराज देशपांडे या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत तब्बल 84 टक्के गुण मिळाले. यावरती हजारो विद्यार्थी / विद्यार्थींनींना पडलेला प्रश्न असा की एकही दिवस शाळेला न जाता जानव्ही परिक्षेला प्रविष्ट कशी होऊ शकते आणि इतके गुण कसे मिळवू शकते, तर ती बाब आता शक्य आहे. 

शाळेला न जाता विद्यार्थी / विद्यार्थीनी कशाप्रकारे परिक्षा देऊ शकतात...
काहीवेळा पालकांच्या नोकरीच्या समस्यांमुळे किंवा पालकांच्या फिरस्तीच्या नोकरीमुळे एका ठिकाणी राहून त्यांच्या पाल्यांची शाळा हाताळता येऊ शकत नाही, तर काही पालक आपल्या पाल्यांना एकटं घरी न ठेवता आपल्यासोबत आपल्या फिरस्तीच्या व्यवसायावर घेऊन जात असतात. अशावेळी पालकांच्या व्यवसायासोबतच गरजेचं असतं ते म्हणजे मुलांचं शिक्षण. म्हणून मुलांच्या शिक्षणावर पालकांच्या व्यवसायाचा कोणताच परिणाम होऊ न देण्यासाठी शाळेकडून 17 नंबरचा फॉर्म भरला जातो, जेणेकरून महत्वाच्या असलेल्या परिक्षेला उपस्थित राहून संबंधीत विद्यार्थी / विद्यार्थीनी परिक्षा देऊ शकते. 

दहावीपर्यंतचं शिक्षण आणि जानव्हीची भ्रमंती...
देशात नसला तरी बाहेरच्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक फंडा आहे. तो म्हणजे होमस्कूलिंगचा. आपल्या पाल्यांना शाळेला न पाठवता किंवा कोणत्याही क्लासला न पाठवता आपल्या पाल्यांचा घरीच अभ्यास घेऊन किंवा त्यांना प्रत्यक्ष अनुभवाच्या जोरावर प्रत्यक्ष शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. जानव्हीच्या बाबतीत देखील हेच घडलं. 

जान्हवीची आई निलीमा देशपांडे ह्या पेशाने टुरिझम व्यवसायिक आहेत. त्या महाराष्ट्र, देश आणि देशाच्या बाहेरही या व्यवसायाच्या निमित्ताने जात असतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ऐतिहासिक आणि पर्यटन ठिकाणाची त्यांना संपूर्ण माहिती आहे, याचाच फायदा जानव्हीला झाला. 

चार भिंतीच्या आत आणि प्रत्यक्ष शिकवलेल्या भुगोलात किती तफावत असते, हे जान्हवीने साधलं होतं. भरती-ओहोटी कशी असते, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्र का खवळतो यापासून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला, कुठे झाला, महाराजांचा इतिहास गडकोटांमध्ये कसा दुमदुमला असा धडाडीचा इतिहास त्या-त्या गडकोटावर जाऊन शिकण्याचं काम जान्हवीने आपल्या पालकांसोबत केलं.

गणित, विज्ञानाची प्रत्यक्ष प्रात्यक्षित करून गणित आणि विज्ञान या विषयांत जान्हवीने आपला हातखंड बसवला. वडील सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने विज्ञान आणि गणित विषयांत त्यांची मदत जान्हवीने करून घेतली. प्रत्येक गोष्टीत विज्ञान असतं, याचा धडा जान्हवीने पुस्तकी नाही तर प्रात्यक्षिताच्या माध्यमातून घेतला.

जान्हवी सांगते...
आई-वडिलांमुळे मला जगात नवी ओळख मिळाली, पण त्याचसोबत अभ्यास करण्यासाठी नवा मार्ग आणि नवी दृष्टी मिळाली. होम स्कूलिंगचा प्रकार काय असतो, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अभ्यास, परीक्षा, शिक्षण या गोष्टी मी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत वेगळ्याप्रकारे शिकल्या. त्यामुळे मी आनंदी आहे. यापुढे गणित, अर्थशास्त्र, फ्रेंच या विषयांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन आणि क्लासकल्चरलचाही अनुभव घेणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News