त्याची शेवटची यात्रा ही मित्रांच्याच खांद्यावर...

विपुल पोहरे
Sunday, 21 July 2019

 पातूर येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू 

अकोला: पातूर येथील आकाश सुरवाडे या तरूणाचा गुरूवारी (ता. १८) अपघात झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. अश्यातच उपचारादरम्यान शनिवारी (ता. २०) सकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मित्रांचा जीव की प्राण असलेल्या आकाशचा शेवटचा प्रवासही मित्रांच्याच खांद्यावर झाला.
 
नेहमी हसत मुख, मेहनती, मनमिळाऊ असलेल्या आकाशची शनिवारी (ता. २०) अकोला येथील खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली. शुक्रवारी (ता १८) रात्री नऊ वाजताच्या सुमारास वैयक्तीक कामानिमीत्त पातूर वरून अकोला कडे  दुचाकीवरून जात असताना वरखेडनजीक विरूद्ध दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. यामुळे आकाश खाली कोसळला. खूप काळ आकाश रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून होता. नंतर या मार्गाने रहदारी करणाऱ्या युवकाचे लक्ष आकाश कडे गेले असता. त्या युवकाने आकाशच्या मोबाईलवरून त्याच्या मित्रांना कळविले.  

मित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन आकाशला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी आकाशवर उपचार करण्यास सुरूवात केली असता. उपचारादरम्यान आकाशच्या मेंदूला जबर मार लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आकाशची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार   रूग्णालय अकोला येथे हलविण्यात आले. असता शनिवारी (ता. २०) सकाळच्या दरम्यान आकाशला येथील डॉक्टरांनी अखेर मृत घोषित केले. त्यानंतर आकाशचा मृतदेह शवविच्छेदनकरिता पाठविण्यात आला. यानंतर आकाशचा मृतदेह पातूरमध्ये पोहचताच पातूरकरांवर शोककळा पसरली होती. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता दरम्यान आकाशच्या पार्थीवावर अत्यंत भावपूर्ण वातावरणात अंतीम संस्कार करण्यात आले.  त्याच्या अचानक जाण्याने आई, वडील, भाऊ व मित्रांवर दुखःचा डोंगर कोसळला.

 "अन आई वडिलांच्या आधार हरवला" 
आकाशला एक मोठा भाऊ होता परंतु आकाश हा अत्यंत मेहनती व कष्टाळू व मन मिळवू असल्यामुळे त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करून एखादा मोठा अधिकारी होणार असल्याची अपेक्षा होती परंतु आकाशच्या अपघाती निधनामुळे आई वडिलांचा आधार हरवलीयाची खंत आई वडील व्यक्त करीत आहेत 

"मित्राचे मित्रत्व हरविले"
आकाशचे मित्र हे पातूर पुरते मर्यादित नव्हते आकाश जिथे जायचा तेथे त्याचे स्वभाव बघून त्याचे मित्र परिवार तयार व्हायचा. आकाशच्या अचानक जाण्याची वार्ता कळताच त्यांच्या मित्रा मध्ये अत्यंत दुःखाचे वातावरण पाहवयास मिळत होते. आकाशच्या जाण्याच्या बातमीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आकाशाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी येताच त्यांच्या मित्रांनी एकच आक्रोश केला होता"

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News