हिंगोलीकरांचे दातृत्व सिध्द पुरग्रस्तासाठी तांदूळ, गव्हांचे कट्टे, रोख रक्कमेचीही मदत

मंगेश शेवाळकर
Saturday, 10 August 2019
  • बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी रोख रक्कम जमा केली तर काही जणांनी गहू, तांदूळा कट्टे, तेलाचे डब्बे देखील दिले.
  • पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावलेल्या हजारो हातांमुळे हिंगोलीकरांचे दातृत्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

हिंगोली :  येथील पालिका प्रशासनातर्फे शनिवारी (ता.१०) 
काढण्यात आलेल्या पुरग्रस्तांच्या मदत फेरीला मोठा प्रतिसाद 
मिळाला. कोल्हापूर, सांगली भागातील पुरग्रस्तांसाठी हिंगोलीकरांचे हजारो हात पुढे आले. त्यातून रोख रक्कमेसह तांदूळ, गहू याचे कट्टे दिले. यामधे हिंगोलीकरांनी दातृत्व सिध्द केले आहे.

येथील पालिका कार्यालयापासून मदत फेरीला सुरवात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक गणेश बांगर, अनिल नेनवाणी, नाना नायक, पत्रकार डॉ. विजय निलावार, गणेश साहू, चंदू लव्हाळे, बाळू बांगर, विनय साहू, किशोर खंडेलवाल, श्री. ठाकूर यांच्यासह महिला बचतगटाचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी शहरातून मदतीसाठी हजारो हात पुढे आले. 

शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मदतफेरीमधे नागरीकांनीही रस्त्यात थांबून सढळ हाताने मदत केली. कर्तव्यावर असलेल्या  पोलिसकर्मचाऱ्यांनी एकीकडे कर्तव्य पार पाडत दुसरीकडे पुरग्रस्तांसाठी मदत देऊन माणुसकीचा प्रत्यय दाखवून दिला. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी रोख रक्कम जमा केली तर काही जणांनी गहू, तांदूळा कट्टे, तेलाचे डब्बे देखील दिले.

याशिवाय बिस्कीट पुड्यांचे डब्बे देखील देण्यात आले. कपडा व्यापाऱ्यांनी लहान मुलांसह जेष्ठ नागरीकांसाठी लागणारे रेडीमेड कपडे दिले. यावेळी फळ विक्रेत्यांनीही फळे देखील दिली. तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्यापरीने आर्थिक मदत केली. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावलेल्या हजारो हातांमुळे हिंगोलीकरांचे दातृत्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

देशात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हिंगोलीशहरासह जिल्हाभरातून तातडीने मदत केली जाते. त्यानुसार या पुरग्रस्तांसाठीही तातडीने मदत जमा झाली आहे. या फेरीतून जमा झालेली मदत गुरुवारी (ता.१५) पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे सुपुर्द केली जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News