हिंगोलीच्या जवानाने वाचविले २३ जणांचे प्राण

मंगेश शेवाळकर
Monday, 29 July 2019

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथील जवानाने मध्य प्रदेशातील कालापीपल या गावातील पूरग्रस्त भागात रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून तेवीस गावकऱ्यांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथील जवान बाळासाहेब खिस्ते हे नॅशनल डिझास्टर इमर्जन्सी रेस्क्यू फोर्समध्ये आसाम येथे कार्यरत आहेत. मध्यप्रदेशातील शिओर जिल्ह्यामध्ये कालापीपल भागात मोठा पूर आला आहे. या गावातील अनेक गावकरी पुरात अडकले होते गावकऱ्यांच्या सुटकेसाठी श्री खिस्ते यांचे सात जणांचे पथक रवाना करण्यात आले होते. 

लाईफ जॅकेट, रबर बोट व स्कुबा डायविंग सेट आदीसह आवश्यक साहित्य घेऊन श्री. खिस्ते यांचे पथक कालापीपल भागात गेले. त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पूरग्रस्त भागात अडकून पडलेल्या तेवीस जणांची सुखरूप सुटका केली आहे शनिवारी (ता. २७) व  रविवारी (ता. २८) या दिवशी श्री. खिस्ते यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. 

दहा दिवसांपूर्वी आसाम मध्ये आलेल्या पूरग्रस्त भागात गावकऱ्यांना धान्य व आवश्यक साहित्य पुरविण्याचे काम आहे. त्यांच्या पथकाने केली आहे. हिंगोलीच्या या जवानाच्या कामगिरीबद्दल जिल्हावासीयांनी अभिनंदन केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News