जॉन दिसणार या हिंदी रिमेक मध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

अभिनेता जॉन अब्राहम सध्या ‘बाटला हाऊस’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे.

त्याबरोबरच ‘सत्यमेव जयते २’ आणि ‘पागलपंती’ या चित्रपटांचीदेखील तो तयारी करत असून, २०१५मध्ये प्रदर्शित झालेला तमीळ चित्रपट ‘वेदलम’च्या हिंदी रिमेकमध्ये तो दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत. त्यांनी या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचे हक्क मिळवले आहेत. चित्रपटाचे कथानक पूर्ण झाल्यानंतर चित्रपटातील दिग्दर्शक आणि इतर कलाकरांची नावे समोर येतील. ‘वेदलम’ चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अमितकुमारने मुख्य भूमिका साकारली होती.

आता जॉनला या चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News