‘कमोलिका’नंतर हिना खान नव्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

एकता कपूर ‘नागीन 4’ ही मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता.

अभिनेत्री हिना खानला ‘बिग बॉस १२’ मुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. यामुळे तिची फॅन फॉलोईंग कमालीची वाढली. 

नुकतीच ती ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेत ‘कमोलिका’ची भूमिका साकारत होती. त्यानंतर काही कारणास्तव तिने या मालिकेतून एक्‍झिट घेतली.

आता ती एका नव्या मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ‘नागीन’ या फ्रेंचाईजची ‘नागीन ३’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. 

आता एकता कपूर ‘नागीन 4’ ही मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. या मालिकेसाठी एकता हिनाच्या नावाचा विचार करत असल्याच्या चर्चा आहेत. यापूर्वी ‘कमोलिका’च्या भूमिकेने तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ‘नागीन 4’ मध्ये तिची भूमिका कशी असणार, हे पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News