हिमाचलमधील सारा - कार्तिकचा फोटो व्हायरल 

सकाळ (यिनबझ)
Monday, 24 June 2019
  • पुन्हा एकदा कार्तिक-साराची चर्चा

  • हिमाचलमधिल सारा - कार्तिकचा फोटो व्हायरल

 मुंबई : सतत चर्चेत असणारी बॉलिवु़ड जोडी म्हणजे सारा आणि कार्तिक आर्यन. नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणावरुन हे दोघही चर्चेत असतात. कधी त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतात तर कधी लव्ह रिलेशनमुळे चच्रेत असतात. नुकतच सारा आणि कार्तिकचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. हा फोटो बघितल्यावर प्रत्येकालाच असं वाटणार की, हे दोघेही लव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र हा फोटो आहे ‘लव्ह आज कल २’या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Cute couple #kartikaaryan #saraalikhan #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सारा आणि कार्तिक हे दोघेही इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल २’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची शुटींग सध्या हिमाचलमध्ये सुरु आहे. शुटींग दरम्यान सारा आणि कार्तिकचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायल झाला आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला‘लव्ह आज कल’हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच हिट ठरला होता. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली होती. आता त्याच चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सारा-कार्तिक मुख्य भूमिका साकारणार आहेत. आता, सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री पाहता चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली असेल इतक नक्की..!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News