अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कमाल, रेल्वे स्थानकातील भिंती रंगवल्या

सकाळ (यिनबझ)
Friday, 8 November 2019

नेरळ :  मध्य रेल्वेच्या शेलू या उपनगरी स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक कामे सुरू आहेत; मात्र तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानकातील भिंती रंगवल्या. स्थानकाचे रूपडे पालटविण्याचे काम भावी अभियंत्यांनी केल्याने प्रवासी खूश आहेत.

नेरळ :  मध्य रेल्वेच्या शेलू या उपनगरी स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक कामे सुरू आहेत; मात्र तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानकातील भिंती रंगवल्या. स्थानकाचे रूपडे पालटविण्याचे काम भावी अभियंत्यांनी केल्याने प्रवासी खूश आहेत.

शेलू स्थानकात गेल्या काही वर्षांत गर्दी वाढली आहे. १० वर्षांपूर्वी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. महाविद्यालयाबरोबर मुंबईमधील मध्यमवर्गीयांचे लोंढेही सतत येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना सोईसुविधा मिळाव्यात म्हणून अनेक कामे सुरू आहेत. आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करावे म्हणून विद्यार्थ्यांनी स्थानकाचा रुक्ष वाटणारा परिसर आनंददायी बनविण्याचा निर्णय घेतला. स्थानक बंदिस्त करणाऱ्या भिंती या दगड भिंतीच्या असून, त्यावर रेल्वेकडून कधीतरी रंगरंगोटी केली जाते. त्यात पान खाऊन पिचकारी सोडणारे प्रवासी यांची शेलू स्थानकात काही कमी नाहीत. त्यामुळे त्या दोन्ही बाजूच्या भिंती, पादचारी पुलाच्या भिंती आणि स्थानक प्रबंधक यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर यांच्या भिंती रुक्ष बनल्या होत्या, ही बाब या भागात अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रुचली नाही. त्यांनी मध्य रेल्वेच्या परवानगीने स्थानकात असलेल्या भिंतींना अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून रंगांनी भिंती सजवल्या. त्यात भिंतींवर दगड कोरून त्यात रंग भरले. काही ठिकाणी फुले काढली तर काही ठिकाणी आकर्षक वाटतील अशी चित्रे काढली. त्यामुळे रुक्ष वाटणाऱ्या भिंती आकर्षक दिसू लागल्या असून, त्या बोलक्‍याही बनल्या आहेत.

"पूर्वी आमच्या स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांची संख्या कमी होती; मात्र अभियांत्रिकी महाविद्यालय आले आणि त्या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यामुळे आमचे स्थानक रंगीबेरंगी आणि आकर्षक बनले आहे."
- ॲड. सूर्यकांत मसणे, प्रवासी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News