आस तुझ्या येण्याची...

सुनिल पवार
Tuesday, 11 June 2019

तुझ्या आगमनाची नांदी झाली
न जाणे कुठूनशी कोणी वर्दी दिली...

तुझ्या आगमनाची नांदी झाली
न जाणे कुठूनशी कोणी वर्दी दिली
हर्षाचा स्पर्श मनास झाला
तू तिथे पडला 
अन् मृदुगंध इथे मनी हुळहुळला...

मी अनुभवतोय त्या हर्षला
अन् हर्षातील त्या वर्षावाला
त्यांच्या सांगण्यातुन प्रत्येक शब्दातुन
तू पाझरतो आहेस 
अन् मी ही अनुभवतोय त्याच अनुभूतीला...

तू तिथे आलास तसाच पुढे इथेही येशील
माझ्या आशेला नवी पालवी देशील
म्हणूनच मी अजून उभा आहे वाट पाहत
तू सूर्याच्या डोईवर
कधी ना कधी तरी सावली धरशील...
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News