येथे मराठा वसतिगृहाचा प्रश्न कायमच

जालिंदर धांडे
Monday, 24 June 2019

शहरातील आयटीआय परिसरातील शासकिय वसतिगृहातील दुसरा व तिसरा मजला

मराठा वसतिगृहासाठी देण्यात येणार आहे.परंतु सध्या येथील प्रलंबित कामे संथगितीने सुरु आहेत. 
 

 

बीड - शहरातील आयटीआय शासकिय वसितगृह इमारतीतील तिसरा व चौथ्या मजला मराठा वसतिगृहासाठी देण्यात येणार असुन त्यांचे काम गेल्या अनेक महिन्या पासुन सुरु आहे. परंतु हे काम संथगतिने सुरु आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही या मराठा वसतिगृहाचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही. यंदाही ग्रामिण भागातील मराठा विद्यार्थ्यांना शहरात राहण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु या गंभीर प्रश्नांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 
 

राज्यात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ५८ मुक मोर्चे काढण्यात आले होते. याच दरम्यान राज्य शासनाच्या वतिने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजासाठी एका वसतिगृहाची उभारणी करण्याची कबुली प्रशासना तर्फे देण्यात आलेली होती. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतिने शहरातील आयटीआय परिसरातील शासकिय वसतिगृहातील दुसरा व तिसरा मजला, मराठा वसतिगृहासाठी देण्याचे ठरले होते. यामुळे येथील इमारतीची दुरुस्थी करण्यास सार्वजनिक बांधकामाच्या वतिने सुरुवात केली होती. परंतु आता पर्यंत सुद्धा या इमारतीचे प्रलंबित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतिने करण्यात आलेले नाही. सध्या या इमारतीचे काम संथगतीने सुरु आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही मराठा समाजातील मुलांना या वसतिगृहाचा फायदा होताना दिसत नाही. यामुळे परत एखदा मराठा समाजाची फसवणुक प्रशासनाच्या वतिने होताना दिसत आहे. 
 

मराठा वसतिगृह पंधरा दिवसात सुरु करण्याची मागणी
सध्या सर्वच महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये ग्रामिण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने दिसुन येत आहे. यंदा पडलेल्या दुष्काळामुळे ग्रामिण भागातील ग्रामस्थ मोठ्या अर्थिक संकटात सापडलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यात मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसे पेलत नाही. यामुळे किमान शहरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यातील मराठा विद्यार्थी मराठा वसतिगृहा तात्काळ सुरु करण्याची मागणी करत आहेत. 
 

जिल्ह्यात दहा युवकांनी दिले होते बलिदान
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील दहा मराठा युवकांनी बलिदान दिले होते. परंतु त्यांच्या बलिदानाची जाणिव प्रशासनास होताना दिसत नाही. गेल्या दिड ते दोन वर्षापासुन शहरातील मराठा वसतिगृहाचा प्रश्न कायम असुन याचा सर्वात जास्त त्रास मराठा विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News