तिची गाणी, त्याची गाणी

ऋषी कपूर
Thursday, 28 February 2019

ऋषी कपूर म्हणल्याक्शणी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो एक चॉकलेट हीरो. गुलजार, देखणा, हॅण्डसम, टिपिकल कपूर. रोमॅंटिक भूमिका, नाच, गाणी या पलीकडे आपण त्याला आठवू शकत नाही. पण ऋषी एक अत्यंत समर्थ अभिनेता होता. चित्रपटसृष्टी केवळ त्याच्या रोमॅंटिक इमेजचा फायदा घेत राहिली. तो तिथला भाग आहे. मात्र आपण त्याच्या गाण्यांबद्दल व अभिनयाबद्दल न बोलणे हा त्याच्यावर अन्याय होईल. वडील राज कपूर यांच्या प्रमाणेच ऋषीला सूर व शब्द यांची अचूक जाण होती. अजून एक गोष्ट त्याने त्यांच्याकडून घेतली होती, ती म्हणजे, अतिशय बोलका व क्षणात भाव बदलणारा चेहरा.

ऋषी कपूर म्हणल्याक्शणी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो एक चॉकलेट हीरो. गुलजार, देखणा, हॅण्डसम, टिपिकल कपूर. रोमॅंटिक भूमिका, नाच, गाणी या पलीकडे आपण त्याला आठवू शकत नाही. पण ऋषी एक अत्यंत समर्थ अभिनेता होता. चित्रपटसृष्टी केवळ त्याच्या रोमॅंटिक इमेजचा फायदा घेत राहिली. तो तिथला भाग आहे. मात्र आपण त्याच्या गाण्यांबद्दल व अभिनयाबद्दल न बोलणे हा त्याच्यावर अन्याय होईल. वडील राज कपूर यांच्या प्रमाणेच ऋषीला सूर व शब्द यांची अचूक जाण होती. अजून एक गोष्ट त्याने त्यांच्याकडून घेतली होती, ती म्हणजे, अतिशय बोलका व क्षणात भाव बदलणारा चेहरा. आणि ह्याच दोन गोष्टींसाठी 'त्याची गाणी' सदरासाठी तो पात्र ठरतो. सत्तर व ऐंशीच्या दशकांमधली त्याची अनेक गाणी आपण आजही ऐकतो, गुणगुणतो. पण आज काही गाणी अशी आठवूया की जी एरवी आपण म्हणतोच असे नाही.

जीतेंद्र व रीना रॉय यांच्याबरोबर त्याचा 'बदलते रिश्‍ते' नावाचा एक, तसा कमी प्रसिद्ध, चित्रपट आहे. ऋषीचे व रीनाचे कॉलेज मधे प्रेम असते. पण नंतर तिचे लग्न जीतेंद्र बरोबर होते. ती त्याला विसरलेली नसते. त्यामुळे काही काळानंतर योगायोगाने तो परत भेटतो, तेव्हा पुन्हा ती त्याच्यात गुन्तत जाते. हे अयोग्य आहे हे जाणून ऋषी असा काही वागत जातो की शेवटी ती त्याचा तिरस्कार करू लागते. ऋषी निघून जातो. बाकी सर्व सोडा. हा चित्रपट बघायचा तो फक्त आणि फक्त ऋषीच्या अभिनयासाठी. चित्रपटाच्या शेवटी तो त्याच्या प्लॅन मधे 'यशस्वी' होतो खरा. पण तसे यश म्हणजे त्याचे अपयशच असते. त्या क्षणाला त्याच्या डोळ्यात जे 'मी जिंकलो, मी हरलो' असे भाव आहेत ना.... बास... फक्त त्या एका सेकंदासाठी तीन तास थांबायच...

या चित्रपटाच्या शेवटी एक गाणे आहे. शब्द, सूर व संगीत याची जाण असलेला माणूस काय पद्धतीने अभिनय पेश करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून हे गाणे घ्यावे लागेल. शब्द असे आहेत;

ना जाने कैसे पल मे बदल जाते हैं
ये दुनिया के बदलते रिश्ते…
याच गाण्याचे शेवटचे कडवे जे आहे ना, त्यात ऋषीचा अभिनय बघाच.

रिश्ते कभी टूटे कहाँ जो टूट जाए वो रिश्ते नहीं
छुपि है उदासी के पीछे हँसी
दबी दर्द मे भी खुशी है कहीं
सच तो है ये बस प्यार से जीवन हमारे बदल जाते हैं
ये दुनिया के बदलते रिश्ते
वर थोडक्यात ष्टोरी सांगीतलीय ना, त्या बॅकग्राउंड वर हे शब्द व ऋषीचा अभिनय, बेजोड अभिनय, बघायलाच हवा.

'दामिनी' हा चित्रपट आपल्याला सर्वांना माहीत आहे तो मीनाक्षी शेषाद्रीच्या व सनी देओलच्या अभिनयासाठी. तारीख पे तारीख, ढाई किलो का हाथ, आदमी उठता नहीं उठ जाता है, इत्यादी डाइलॉग्स आपल्याला नक्की माहीत आहेत. शेवटच्या कोर्ट सीन मधला मीनाक्षीचा अभिनय तर लाजवाब आहे. त्यावर्षीचे फिल्मफेअर मिळता मिळता राहून गेले. आता चित्रपटाचा नक्की हिरो कोण हा मात्र मला प्रश्नच आहे. केवळ नायिकेचा नवरा म्हणून ऋषी नायक असा अर्थ काढून सनीला 'सर्वोत्तम सहायक' अभिनेत्याचे अवॉर्ड मिळाले. माझ्या मते खरा नायक सनीच आहे. त्याला सर्वोत्तम नायकाचे व ऋुषीला सर्वोत्तम सहायक अभिनयाचे अवॉर्ड मिळायला हवे होते. त्याच त्या कोर्टरूम मधल्या शेवटच्या सीनमधे तो कोर्टात येऊन सर्व गोष्टींची कबुली देतो. त्यावेळी शेवटी तो म्हणतो की (दामिनीकडे बोट दाखवून) ये दामिनी मेरी पत्नी है और मुझे नाज है के मैं इसका पती हूँ.... (इसका वर जोर देऊन). वा ऋषी वा...
या भानगडीत सर्वोत्तम अभिनेत्याचे त्या वर्षीचे अवॉर्ड 'बेटा' चित्रपटासाठी अनिल कपूरला मिळाले व सर्वोत्तम अभिनेत्रीचे त्याच चित्रपटासाठी माधुरीला.

या चित्रपटात एक गाणे आहे 'गवाह हैं चाँद तारे गवाह हैं' ह्या गाण्यात दामिनीप्रती आपले प्रेम व्यक्त करताना तो म्हणतो;
तुमको रखूंगा दिल में बसा के
मेरी धड़कन तुम हो
देखूंगा तुमको शाम ओ शहर में
मेरा दर्पन तुम हो
जी ना सकूंगा मैं होके जुदा
हे गाणे अजिबात 'लै भारी' वगैरे नाहीये. पण वरच्या ओळी गाताना ऋषीच्या डोळ्यातील प्रेम व त्यातला सच्चेपणा बघण्यासारखा आहे.

'चांदनी' मधले 'तू मुझे सुना, मैं तुझे सुनाऊ अपनी प्रेमकहानी' हे त्याचे विनोद खन्नाबरोबरचे गाणे घ्या, 'सरगम' मधले 'मुझे मत रोको, मुझे गाने दो' हे गाणे घ्या किंवा 'सागर' मधले 'सागर जैसी आँखोवाली' घ्या किंवा 'कर्ज' मधले 'एक हसीना थी' घ्या, ऋषीच्या अभिनयाला तोड नाही. अत्यंत व्यावसायिक वृत्तीने, कुठल्याही प्रकारची थेर न करता, निर्माते व दिग्दर्शक यांना त्रास न देता, १००% अभिनय करणारा ऋषी हा तिसरा. दुसरा अमिताभ. आणि पहिला अर्थातच देव आनंद.

प्रेक्षक, समीक्षक, निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, सर्वांनी वेळोवेळी ऋषीचे कौतुक केले. पण त्या कौतुकाचे अवॉर्ड मधे मात्र रूपांतर झाले नाही. पहिल्याच चित्रपटासाठी (बॉबी, १९७४) त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर डाइरेक्ट २०१७ मधे 'कपूर अँड सन्स' साठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा. मधल्या त्रेचाळीस वर्षात काहीही नाही. वडील राज कपूरना ११ फिल्मफेअर, मुलगा रणवीरला ऑलरेडी ५ फिल्मफेअर, ह्याचे मात्र हे असे. दुर्दैव नाहीतर काय? असो. ऋुषीला याबद्दल काहीच वाटले नसेल का किंवा वाटत नसेल का? जरूर वाटत असेल. शेवटी तोही माणूसच आहे की. पण याबद्दल कधीही एक शब्द त्याने व्यक्त केलेला माझ्या तरी ऐकण्यात किंवा वाचनात नाही.

रणवीरला त्याच्या पहिल्याच 'सावरिया' साठी 'बेस्ट मेल डेब्यू' चे फिल्मफेअर मिळाले. तेंव्हा ऋषीच्या डोळ्यातून आनंद आणि अभिमान ओसंडून वाहात होता.

Belive me, तो मात्र अभिनय नव्हता…

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News