तिच्या एकेकाळच्या राजाचं लग्न ठरलं...

अभिनव ब. बसवर
Tuesday, 9 July 2019

ब्रेकअपनंतर सुरुवातीला एक वर्षभर तिच्या आठवणीत त्याला प्रचंड त्रास झाला पण ज्यावेळी तिचे प्रिवेडिंगचे वगैरे फोटोज त्याने पाहिले

त्याचं लग्न ठरलं असून होणारी बायको तिच्यापेक्षा सुंदर आहे असं तिच्या कानावर आलं. त्याने फेसबूकवर एंगेज म्हणून स्टेटस शेअर केल्यानंतर तिने त्या मुलीचं सगळं प्रोफाईल उकरून पाहिलं. नवरी खरंच सुंदर होती. त्याने तिला जळवण्यासाठीच असं केलं अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. त्याला कारणही तसंच होतं. ३ वर्षांपूर्वी ज्यावेळी नातं तोडू नकोस असं तो जीव तोडून तिला सांगत होता तेव्हा तिने ऐकलं नाही.

ब्रेकअपनंतर सुरुवातीला एक वर्षभर तिच्या आठवणीत त्याला प्रचंड त्रास झाला पण ज्यावेळी तिचे प्रिवेडिंगचे वगैरे फोटोज त्याने पाहिले आणि ती अगदीच आनंदी आहे असं त्याला जाणवलं त्यादिवसापासून त्याने तिचा विषय डोक्यातून काढून टाकला.
 

पुढे ऑफिस मध्ये नवीन जॉईन झालेल्या एका मुलीशी त्याची ओळख झाली. दोघांचं पटू लागलं. एकमेकांची कंपनी एन्जॉय करू लागले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

इकडे तिच्या लग्नाला तीन वर्षे झालेली. रोजचं रुटीन सुरू होतं. सकाळी उठणे, दोघांचं डबा बनवणे, ऑफिसलाला जाणे. सासू सासरे, नातेवाईक सगळ्यांना काही हवं नको ते पाहणे.सासूने सर्व जबाबदारी तिच्यावर सोपवून संसारातून अंग काढून घेतलेलं. दिवसाचं एक चक्र सुरू झालेलं.

कधीकधी तिला वाटायचं की आपण चुकीचा निर्णय घेतला का ? पण आता तसा विचार करण्यास जागा नव्हती. ती प्रेग्नेंट होती. आई होणार होती. एका नवीन जीवाची जबादारी तिच्या अंगावर पडणार होती. नवरा देखील अर्धा भार उचलायचा पण दोघांच्या नात्यातील नवलाई ओसरलेली. दोघांनाही स्पेस हवी असायची.

फेसबुकवर त्याचे आणि त्याच्या होणा-या बायकोचे फोटोज स्वाईप करताना, एकेकाळच्या तिच्या राजाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अनेक आठवणींनी तिच्या गालावर स्माईल आली आणि डोळ्यातून टचकन पाणी कधी पडलं लक्षात देखील आलं नाही...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News